• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पावसाळी अधिवेशन
  • आजचा जोक
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. know what is world record of javelin throw pakistan arshad nadeem name is included in top 10 neeraj chopra rank spl

Paris Olympic 2024 : भालाफेकमधील विश्वविक्रम काय आहे; Top 10 मध्ये भारताचा नीरज चोप्रा व पाकिस्तानचा अर्शद नदीम कितव्या स्थानी?

Top 10 longest javelin throws: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने ९२.९७ मीटर थ्रोसह सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. जगातील टॉपच्या १० भालाफेकपटूंमध्ये त्याचे नाव सहाव्या स्थानावर आहे.

Updated: August 13, 2024 10:21 IST
Follow Us
  • javelin throw
    1/12

    पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम याने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकले. यावेळी ऑलिम्पिक भालाफेकपटू अर्शदने सर्वांचा पराभव करत विक्रमी अंतरावर भालाफेक करून सुवर्णपदक पटकावले आहे. अशा परिस्थितीत, जगातील टॉप १० लांब भालाफेक कोणते आणि किती अंतराचे आहेत, प्रथम क्रमांकावर कोण आहे हे जाणून घेऊया.

  • 2/12

    जॅन झेलेझनी
    या यादीत पहिले नाव आहे ते चेक प्रजासत्ताकचे दिग्गज ॲथलीट जॅन झेलेझनी यांचे. त्यांनी २५ मे १९९६ रोजी जेना, जर्मनी येथे ९८.४८ मीटर अंतरावर भाला फेकला. त्यांचा हा विश्वविक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.

  • 3/12

    जोहान्स वेटर
    इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात लांब अंतरावर भाला फेकण्याचा विक्रम जर्मनीच्या जोहान्स वेटर या खेळाडूच्या नावावर आहे. त्याने पोलंडमधील चोरझोव येथील स्लोव्स्की स्टेडियमवर ६ सप्टेंबर २०२० रोजी ९७.७६ मीटर अंतरावर भाला फेकला.

  • 4/12

    थॉमस रोहलर
    या यादीत जर्मन ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट थॉमस रोहलर तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने ५ मे २०१७ रोजी कतारमधील दोहा येथील सुहैम बिन हमाद स्टेडियममध्ये ९३.९० मीटर अंतरापर्यंत भाला फेकला.

  • 5/12

    ऐकी पर्वियेनें
    या यादीत चौथ्या क्रमांकावर फिनलंडच्या अकी परव्हिएनेनचे नाव आहे. त्याने २६ जून १९९९ रोजी फिनलंडमधील कुओर्टेन येथे ९३.०९ मीटर भालाफेक केला.

  • 6/12

    अँडरसन पीटर्स
    १३ मे २०२२ रोजी, सुहैम बिन हमाद स्टेडियमवर, ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने ९३.९० मीटर अंतरावर भाला फेकून यै यादीत पाचवे स्थान मिळवले.

  • 7/12

    अर्शद नदीम
    अर्शद नदीमने ९२.९७ मीटर फेक करून नवा ऑलिम्पिक विक्रम तर केलाच पण या यादीत सहावे स्थानही पटकावले. त्याने ८ ऑगस्ट २०२४ रोजी पॅरिसमधील स्टेड डी फ्रान्स स्टेडियमवर हा विक्रम केला.

  • 8/12

    ज्युलियस येगो
    केनियाच्या ज्युलियस येगोने २६ ऑगस्ट २०१५ रोजी बीजिंग येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ९२.७२ मीटर भालाफेक करून या यादीत सातवे स्थान मिळविले होते.

  • 9/12

    सेर्गेई मकारोव
    रशियाच्या सर्गेई माकारोव्हने ३० जून २००२ रोजी इंग्लंडमधील शेफील्ड येथे ९२.६१ मीटर भालाफेक करून या यादीत आठवे स्थान मिळवले.

  • 10/12

    रेमंड हेच
    या यादीत जर्मनीच्या रेमंड हेचचे नाव ९व्या स्थानावर आहे. त्याने २१ जुलै १९९५ रोजी ओस्लो, नॉर्वे येथे ९२.६० मीटर अंतरापर्यंत भाला फेकला.

  • 11/12

    अँड्रियास हॉफमन
    या यादीत जर्मनीच्या अँड्रियास हॉफमनचे नाव दहाव्या स्थानावर आहे. त्याने २ जून २०१८ रोजी ऑफेनबर्ग येथे ९२.०६ मीटर अंतरावर भाला फेकला होता.

  • 12/12

    नीरज चोप्रा
    भारताच्या नीरज चोप्राबद्दल बोलायचे झाले तर तो या यादीत २५ व्या स्थानावर आहे. ३० जून २०२२ रोजी स्टॉकहोममधील ऑलिम्पिया स्टॅडियनमध्ये त्याने ८९.९४ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला.
    (Photos Source: REUTERS)

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024क्रीडाSportsनीरज चोप्राNeeraj ChopraपॅरिसParisमराठी बातम्याMarathi News

Web Title: Know what is world record of javelin throw pakistan arshad nadeem name is included in top 10 neeraj chopra rank spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.