-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावतने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांची भेट घेतली. यावेळी कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावतचे दिलीप जोशी यांनी अभिनंदन केले.
-
यावेळी जेठालालने अमनसोबत फाफडा-जलेबी खाल्ली. दिलीप जोशी यांना भेटून अमन आनंदी झाला आणि अशा अभिनेत्याला भेटणे हे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले. (छायाचित्र – amansehrawat057)
-
इन्स्टाग्रामवर अभिनेत्यासोबतचे फोटो शेअर करत अमन सेहरावतने लिहिले की, आज जेठालाल (दिलीप जोशीजी) यांना भेटून खूप आनंद झाला. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये मालिकेतून ते खूप मनोरंजन करतात. त्यांना भेटून मला खूप आनंद झाला.
-
फोटोमध्ये आपण पाहू शकतो की अमन आणि दिलीप जोशी संभाषण करत आहेत. दिलीप जोशी यांनी अमनला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल खास भेटवस्तू दिली.
-
अमन सेहरावतने यापूर्वी सांगितले होते की तो आपल्या फावल्या वेळेत तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पाहतो.
-
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावत तारक मेहताचा जेठालाल उर्फ दिलीप जोशी यांच्यासोबत फोटो काढला.
-
दिलीप जोशी यांनी अमन सेहरावतसोबतचे काही फोटो त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले. त्याचबरोबर त्यांनी लिहिले की, मी अमन सेहरावतच्या कांस्यपदक जिंकण्याचा आनंद फाफडा-जलेबी खाऊन साजरा केला.अमनला भेटून त्याच्यासोबत वेळ घालवल्याचा मला अभिमान वाटतो. तो सर्वांसाठी एक प्रेरणा आहे. (Photo Source- amansehrawat057)
PHOTOS : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता कुस्तीपटू अमन सेहरावतने घेतली जेठालालची भेट, फाफडा-जिलेबी खाऊन साजरा केला आनंद
Wrestler Aman Sehrawat meets Jethalal aka Dilip Joshi : दिलीप जोशी (जेठालाल) यांनी अमन सेहरावतसोबतचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी लिहिले मी अमन सेहरावतच्या कांस्यपदक जिंकण्याचा आनंद साजरा केला.
Web Title: Olympic medalist wrestler aman sehrawat meets jethalal aka dilip joshi enjoys fafda jalebi vbm