-
भारताच्या अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने अंतिम फेरीत 249.7 स्कोर करत सुवर्णपदक जिंकले. (पीटीआय फोटो)
-
अवनीने सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. यापूर्वी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये याच स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. (फोटो स्रोत: अवनी लेखरा/फेसबुक)
-
पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. (फोटो स्रोत: अवनी लेखरा/फेसबुक)
-
अवनी भारतीय क्रीडा क्षेत्रातील एक चमकता तारा म्हणून उदयास आली आहे. आपल्या जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर तिने क्रीडाविश्वात नवा आदर्श निर्माण केला असला तरी तिचा हा प्रवास सोपा नव्हता. (फोटो स्रोत: अवनी लेखरा/फेसबुक)
-
खरंतर अवनीचा २०१२ मध्ये कार अपघात झाला होता. त्यावेळी ती केवळ 11 वर्षांची होती. या अपघातामुळे तिला पूर्ण पॅराप्लेजियाचा त्रास झाला. त्या कठीण काळात तिने पूर्णपणे धीर गमावला होता. (फोटो स्रोत: अवनी लेखा/फेसबुक)
-
ती आतून इतकी खचली होती की ती तिच्या खोलीतून बाहेरही येत नव्हती. मात्र कुटुंबीयांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. तिच्या वडिलांनीच तिला खेळात भाग घेण्याची प्रेरणा दिली. (फोटो स्रोत: अवनी लेखरा/फेसबुक)
-
आधी तिने तिरंदाजीचे प्रशिक्षण घेतले, पण नंतर तिला नेमबाजीत चांगली कामगिरी करता येईल असे वाटले, म्हणून तिने हा खेळ करण्याचा निर्णय घेतला. (फोटो स्रोत: अवनी लेखरा/फेसबुक)
-
शुटिंगसोबतच अवनी अभ्यासातही हुशार आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जयपूरच्या केंद्रीय विद्यालयातून झाले आहे. तिचा शूटिंगचा प्रवासही येथूनच सुरू झाला. ती सध्या राजस्थान विद्यापीठात लॉं चे शिक्षण घेत आहे.
(फोटो स्रोत: अवनी लेखरा/फेसबुक)
Paris Paralympics Games 2024: 11 व्या वर्षी अपघातात मणक्याचे हाड तुटले पण कुटुंबीयांनी दिला धीर; सुवर्ण पदक जिंकणाऱ्या अवनी लेखराचे शिक्षण किती?
Avani Lekhara Education: भारताच्या अवनी लेखरा हिने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये हा पराक्रम केला आहे.
Web Title: Paralympics 2024 education qualification of avani lekhara first woman to win a gold medal spl