-
सिंधुदुर्गातील मालवणमधील राजकोट किल्ल्यामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर देशभरातून या घटनेवर तीव्र पडसाद उमटत आहेत.
-
राज्यातील विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे.
-
तर केंद्रातील सरकारलाही विरोधकांनी सुनावलं आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले गेले असल्याने, केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका होत आहे.
-
फक्त मतांसाठी घाई घाई मध्ये निकृष्ठ दर्जाचे काम करून या पुतळ्याचे उद्घाटन केले गेले, असा आरोप विरोधक करत आहेत.
-
यावरून मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर राणे आणि ठाकरे समर्थक आमनेसामने आल्याचेही काल पाहायला मिळाले होते.
-
दरम्यान, आता यावर आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. दरम्यान काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याप्रकरणी माफी मागितली असून एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबद्दल माफी मागितली.
-
पंतप्रधान मोदींची माफी
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असून त्यांनी आज वाढवण बंदराचे भूमिपूजन केलं. यावेळी बोलताना मोदी म्हणाले, “काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये जे काही घडलं, ते अत्यंत दुख:द आहे. शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर ते आमचे आराध्य दैवत आहेत. मी आज नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो. तसेच जे लोक छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य मानतात, या घटनेमुळे त्यांच्या मनालाही जे वेदना झाल्या आहेत. मी त्यांच्यापुढेही नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो.” -
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी
“झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. दुःख देणारी घटना घडली आहे. मला आता इतकंच सांगायचं आहे पण त्याचं राजकारण करणं हे त्यापेक्षा दुर्दैवी आहे. विरोधकांना अनेक विषय आहेत राजकारण करायला, छत्रपती शिवाजी महाराज ही आपली श्रद्धा आहे, अस्मिता आहे. यावर कृपा करुन राजकारण करु नये. मी माफी मागावी अशी विरोधकांची मागणी आहे तर छत्रपती शिवाजी महाराज हे माझं अराध्य दैवत आहेत त्यांच्या पायावर एकदा नाही शंभरवेळा डोकं ठेवायला तयार आहे. १०० वेळा मी त्यांची माफी मागायला तयार आहे, मला त्यात काहीही कमीपणा वाटणार नाही.” -
उपमुख्यमंत्री अजित पवारांची माफी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका सभेत भाष्य केलं. “महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत असून वर्षभरात त्यांचा असा पुतळा पडणे ही आपल्या सर्वांसाठी धक्कादायक बाब आहे.”, असं अजित पवार यावेळी म्हणाले. (लोकसत्ता संग्रहित फोटो) -
(सर्व फोटो देवेंद्र फडणवीस फेसबुक पेजवरून साभार)

Chhaava : ‘छावा’ची ग्रँड ओपनिंग! विकी कौशलच्या सिनेमाने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी