• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vinesh phogat bajrang punia pt usha gautam gambhir and these 10 famous indian players in politics spl

विनेश फोगटआधी ‘या’ १० बड्या खेळाडूंनी राजकारणात आजमावले नशीब, काहींचा पराभव झाला तर काहींना मिळाले यश

Vinesh Phogat and other Indian players who turned into politicians : विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला आहे. विनेश फोगट हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, या खेळाडूंपूर्वी राजकारणात प्रवेश केलेले इतरही अनेक प्रसिद्ध खेळाडू आहेत. त्यांची संपूर्ण यादी येथे आहे:

September 12, 2024 17:19 IST
Follow Us
  • Vinesh Phogat Politics
    1/12

    कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर विनेश फोगटने राजकारणात आपली नवी इनिंग सुरू केली आहे. अलीकडेच तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत जुलाना मतदारसंघातून पक्षाने विनेशला उमेदवारी दिली आहे. विनेश फोगटला पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो कुस्ती स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून शंभर ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. विनेश फोगटसोबत बजरंग पुनिया यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने बजरंग पुनीयाला किसान सेलचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बनवले आहे.  (Photo: Bajrang Punia/Twitter)

  • 2/12

    ०१- विनेश फोगट आणि बजरंग पुनिया
    विनेश फोगट आणि बजरंग पुनिया हे एकमेव खेळाडू नाहीत जे राजकारणात आपले नशीब आजमावत आहेत. अनेक खेळाडू याआधी खासदार तर काही आमदार बनले आहेत. तर अनेक खेळाडू असेही आहेत ज्यांना पराभवाचा सामना करावा लागला.  (Photo: Bajrang Punia/Twitter)

  • 3/12

    ०२- गौतम गंभीर
    २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरने राजकारणात प्रवेश केला. त्याने भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून निवडणूक लढवली आणि खासदार झाला. मात्र, आता गौतम गंभीरने राजकारण सोडून पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये पुनरागमन केले असून सध्या तो भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा प्रशिक्षक आहे. (Photo: Indian Express)

  • 4/12

    ०३- हरभजन सिंह
    या यादीत भारतीय क्रिकेट संघाचा माजी ऑफस्पिनर हरभजन सिंह याच्या नावाचाही समावेश आहे. २०२२ मध्ये हरभजन सिंहने आप पक्षात प्रवेश केला. सध्या तो आम आदमी पार्टीकडून पंजाब राज्यसभेचा खासदार आहे. (Photo: Harbhajan Singh/FB)

  • 5/12

    ०४- यूसुफ पठाण
    टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणने २०२४ ची लोकसभा निवडणूक पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारचा पक्ष असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या वतीने बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून लढवली होती, ज्यामध्ये तो विजयी झाला. (Photo: Yusuf Pathan/FB)

  • 6/12

    ०५- विजेंदर सिंह
    विजेंदर सिंहने २०१९ मध्ये काँग्रेस पक्षातून राजकीय प्रवासाला सुरुवात केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने त्यांना दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली होती ज्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याचवेळी, या वर्षी एप्रिलमध्ये विजेंदर सिंह यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. (Photo: Vijender Singh/FB)

  • 7/12

    ०६- पीटी उषा
    भारताची महान धावपटू पीटी उषा, ज्यांना उडनपरी या नावाने ओळखले जाते, त्यांनी २०२२ मध्ये राजकीय इनिंगला सुरुवात केली. त्यांना राज्यसभेच्या खासदार म्हणून नामांकन मिळाले होते. (Photo: P T Usha/FB)

  • 8/12

    ०७- दिलीप तिर्की
    भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार दिलीप तिर्की यांनी २०१२ मध्ये ओडिशातील सुंदरगढ मतदारसंघातून बिजू जनता दल पक्षाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. ते २०१२ ते २०१८ पर्यंत राज्यसभेचे सदस्य राहिले आहेत. (Photo: Dilip Tirkey/FB)

  • 9/12

    ०८- राज्यवर्धन सिंह राठोड
    ऑलिम्पिक पदक विजेता राज्यवर्धन सिंह राठोड सध्या राजस्थान सरकारमध्ये उद्योग आणि वाणिज्य, युवा व्यवहार आणि क्रीडा विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर राज्यवर्धन सिंह राठोड यांनी २०१३ मध्ये भारतीय जनता पक्षातून राजकारणात प्रवेश केला. (Photo: Col Rajyavardhan Rathore/FB)

  • 10/12

    ०९- नवज्योतसिंग सिद्धू
    भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू कोणाला माहीत नाही. नवज्योतसिंग सिद्धू यांनी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि अमृतसरमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली, ज्यामध्ये ते विजयी झाले. २००९ मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. मात्र, २०१७ मध्ये त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Photo: Navjot Singh Sidhu/FB)

  • 11/12

    १०- मोहम्मद अझरुद्दीन
    टीम इंडियाचे माजी कर्णधार आणि मॅच फिक्सिंगचे आरोप लागल्यामुळे बंदी असलेले मोहम्मद अझरुद्दीन यांनी २००९ मध्ये काँग्रेसच्या वतीने मुरादाबादमधून निवडणूक लढवली होती, त्यात ते विजयी झाले होते. मात्र, २०१४ मध्ये त्यांना या जागेवरून पराभवाला सामोरे जावे लागले होते. या खेळाडूंव्यतिरिक्त, क्रीडा जगतातील इतर अनेक मोठे चेहरे आहेत ज्यांनी राजकारणात आपले नशीब आजमावले आहे. (Photo: Mohammed Azharuddin/FB)

  • 12/12

    हेही वाचा- दुखःद प्रसंगी मलायका अरोराबरोबर अर्जुन कपूर उभा दिसला, वडील अनिल मेहतांच्या अंत्यविधीसाठी ‘हे’ स्टार्स राहिले उपस्थित

TOPICS
गौतम गंभीरGautam Gambhirनवज्योतसिंग सिद्धूNavjot Sidhuबजरंग पुनियाBajrang Puniyaभारतीय जनता पार्टीBJPमोहम्मद अझरूद्दीनविनेश फोगटVinesh Phogatहरभजन सिंहHarbhajan Singh

Web Title: Vinesh phogat bajrang punia pt usha gautam gambhir and these 10 famous indian players in politics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.