-
कुमार श्री दुलीप सिंहजी यांचा जन्म सौराष्ट्रातील एका राजघराण्यात झाला. ते कुमार श्री रणजीत सिंहजी यांचे पुतणे होते, ज्यांच्या नावावर रणजी करंडक आहे. (Photo- Indian Domestic Cricket Forum Instagram)
-
कुमार श्री दुलीपसिंहजी १९२० च्या दशकाच्या सुरुवातीला किशोरवयात इंग्लंडला गेले आणि १९२१ मध्ये पहिल्यांदा चेल्टनहॅम कॉलेजसाठी खेळले.
-
१९२९ मध्ये दुलीप यांची इंग्लंड संघात निवड झाली आणि त्यांनी १२ कसोटी सामने खेळले. त्यांनी तीन शतके आणि पाच अर्धशतकांसह ५८.५२ च्या सरासरीने ९९५ धावा केल्या. आजारपणामुळे त्यांची कारकीर्द फार काळ टिकू शकली नाही.
-
खराब प्रकृतीमुळे, दुलीप सिंहजी प्रथम श्रेणी क्रिकेटचे फक्त आठ हंगाम खेळू शकले, परंतु त्यांनी २०५ सामन्यांमध्ये ४९.९५ च्या सरासरीने १५,४८५ धावा आणि ५० शतकं केली.
-
दुलीपसिंहजी हे उत्कृष्ट स्लिप क्षेत्ररक्षक होते. क्रिकेट वर्तुळात ते दुलीप किंवा मिस्टर स्मिथ म्हणून ओळखले जायचे. ते लेगब्रेक गोलंदाजीही करायचे.
-
प्रकृतीच्या कारणास्तव दुलीपसिंह यांना वयाच्या २७ व्या वर्षी निवृत्ती घ्यावी लागली. ५ डिसेंबर १९५९ रोजी वयाच्या ५४ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) दुलीप सिंह यांच्या नावाने देशांतर्गत क्रिकेटमधील प्रथम श्रेणी स्पर्धांचे आयोजन करते.
-
१९६१-६२ मध्ये दुलीप ट्रॉफी पहिल्यांदा आयोजित करण्यात आली होती. यापूर्वी ही स्पर्धा झोनल फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती. यंदापासून त्याचे स्वरूप बदलले आहे. (Photos- Express Archive)
Duleep Trophy : १५ हजारांहून अधिक धावा आणि ५० शतकं, ज्यांच्या नावावर दुलीप ट्रॉफी खेळवली जाते ते दुलीप सिंह आहेत तरी कोण?
कुमार श्री दलीप सिंग जी यांची गणना इंग्लंडचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. खराब प्रकृतीमुळे, ते केवळ आठ हंगामांसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळू शकले, परंतु त्यांनी ४९.५० च्या सरासरीने १५,४८५ धावा आणि ५० शतकं केली.
Web Title: Who is kumar shri duleepsinhji connection with duleep trophy 15 thousand runs 50 centuries spl