-
भारतीय क्रिकेटर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. त्यात तिच्या फोटोशूटच्या फोटोचाही समावेश आहे. सध्या तिने नुकतेच केलेले फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
धनश्री वर्माच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स, कमेंट्सचा वर्षाव केला आहे. धनश्रीच्या फोटोवर केलेल्या कमेंट्समध्ये संगीता फोगट हिनेही कमेंट केली आहे, तिच्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
फोटोशूटमधील फोटो शेअर करताना धनश्री वर्माच्या वेगळ्याच कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. बजरंग पुनियाची पत्नी संगीता फोगटने तिच्या पोस्टवर फायर इमोजी कमेंट केली आहे.
-
संगीता फोगट, गेमिंग व्हिडिओ निर्माते पायल, शेफ आणि फूड अँड बेव्हरेज कन्सल्टंट स्नेहा सिंघी उपाध्याय, अभिनेता आणि गायक परवीन खान, मॉडेल रमोना अरेना यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
धनश्री वर्माने गेला काही काळ सोशल मीडियापासून ब्रेक घेतला होता. धनश्री, तिच्या डान्स रिॲलिटी शो ‘झलक दिखला जा’ च्या ११व्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान नृत्यदिग्दर्शक प्रतीक उतेकरसोबतच्या एका व्हायरल फोटोमुळे सुरू झालेल्या ट्रोलिंगनंतर इन्स्टाग्राममधून ब्रेक घेण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल सांगितले होते.
-
इन्स्टाग्रामवर ६.२ मिलियान फॉलोअर्स असलेली धनश्री वर्मा हिने सोशल मीडियावर सक्रिय नसण्याबद्दल सांगितले होते की. मी कधीच ट्रोल्स किंवा मीम्सचा माझ्यावर परिणाम होऊ दिला नाही. पण यावेळेस फरक पडण्याचं कारण म्हणजे माझे कुटुंबीय आणि माझ्या जवळच्या माणसांना याची झळ बसली.
-
पुढे ती म्हणाली, सोशल मीडिया माझ्या कामाचा भाग आहे, याकडे मी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे नकारात्मक वातावरण तयार करू नका.
-
धनश्री वर्मा एक उत्कृष्ट नृत्यांगना आणि कोरिओग्राफर आहे. तिची स्वतःची डान्स स्टुडिओही आहे.
-
डान्सर होण्यापूर्वी धनश्रीला डॉक्टर व्हायचे होते आणि डेंटिस्ट होत तिने हे स्वप्न पूर्ण केलं. धनश्रीचे लहानपणापासून डॉक्टर होण्याचे स्वप्न होते. त्याकाळी नृत्य हा तिचा फक्त छंद होता.
-
धनश्री वर्माने मुंबईच्या डीवाय पाटील कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. एक चांगली डान्सर आणि कोरिओग्राफर असण्यासोबतच तिचा फॅशन सेन्स देखील खूप चांगला आहे. धनश्री खूप फिटनेस फ्रीक आहे.
-
युजवेंद्र चहलने कोरोनाच्या काळात डान्स शिकण्यासाठी धनश्री वर्माशी संपर्क साधला होता आणि इथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. (वरील सर्व फोटो- Instagram-@Dhanashree9)
Photos: शाईन शिमर ग्लिमर… युझवेंद्र चहलच्या पत्नीच्या अदांनी घातली भुरळ, नवे फोटो सोशल मीडियावर होतायत व्हायरल
Yuzvendra Chahal Wife Dhanashree Verma Photo: युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्माचे बोल्ड फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Web Title: Yujvendra chahal wife dhanashree verma glamorous photos goes viral in sparkling dress captioned it champagne glass bdg