• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. kl rahul rishabh pant to starc these 12 star players will appear in ipl 2025 mega auction spl

राहुल, पंतपासून ते स्टार्कपर्यंत ‘हे’ स्टार खेळाडू IPL २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये दिसणार! पाहा कोण आहेत हे १२ जण?

आज अनेक संघांनी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. तर काहींना रिलीज केले. त्यामुळे हे स्टार खेळाडू ऑक्शनमध्ये असतील. पाहूयात कोण आहेत हे खेळाडू (सर्व फोटो- लोकसत्ता संग्रहित)

Updated: October 31, 2024 23:50 IST
Follow Us
  • 'These' 12 Star Players Will Appear in IPL 2025 Mega Auction
    1/12

    IPL 2025 च्या हंगामाआधी मेगा ऑक्शन होणार आहे. यात अनेक स्टार खेळाडू दिसणार आहेत. आज अनेक संघांनी रिटेन खेळाडूंची यादी जाहीर केली. तर काहींना रिलीज केले. त्यामुळे हे स्टार खेळाडू ऑक्शनमध्ये असतील. पाहूयात कोण आहेत हे खेळाडू
    १. जॉस बटलर
    जॉस बटलरने आयपीएलमध्ये पदार्पण २०१४ मध्ये केले. त्याला पहिल्यांदा मुंबई इंडियन्स संघाने निवडले होते. २०१८ मध्ये बटलर राजस्थान रॉयल्स संघात सामील झाला. जॉस बटलरचे आयपीएल करिअर अत्यंत यशस्वी राहिले आहे. 

  • 2/12

    २. क्विंटन डिकॉक
    डिकॉकने आयपीएलमध्ये अनेक उत्कृष्ट कामगिरी केली आहे. क्विंटन डिकॉकने २०१३ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळायला सुरुवात केली होती.

  • 3/12

    ३.ग्लेन मॅक्सवेल
    ग्लेन मॅक्सवेलने २०१२ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याला पहिल्यांदा पंजाब किंग्सने आपल्या संघात घेतले होते. त्यानंतर तो २०१५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघात सामील झाला. RCB संघासाठी त्याने महत्त्वाचे योगदान दिले, २०२१ आणि २०२३ च्या हंगामात त्याची कामगिरी उत्कृष्ट होती.

  • 4/12

    ४. फाफ डुप्लेसी
    फाफ डुप्लेसीने २०११ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि त्यानंतर तो विविध संघांसाठी खेळला. सुरुवातीच्या काळात, तो चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघाचा भाग होता, जिथे त्याने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट कामगिरी केली.

  • 5/12

    ५. लियाम लिविंगस्टोन
    लियाम लिविंगस्टोन टी२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याने आयपीएलमध्ये २०१८ ला पदार्पण केले त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले होते. २०२१ च्या आयपीएल सिझनपासून लिविंगस्टोन पंजाब किंग्जकडून खेळत होता.

  • 6/12

    ६. सॅम करन
    आयपीएल २०२३ मध्ये सॅम करनने पंजाब किंग्जसाठी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले होते.

  • 7/12

    ७. मिचेल स्टार्क
    आयपीएल २०२४ च्या लिलावात मिचेल स्टार्कला कोलकाता नाइट रायडर्सने विक्रमी २४.७५ कोटी रुपयांना खरेदी केले होते, तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

  • 8/12

    ८. जोश हेजलवूड
    जोश हेजलवूडचे आयपीएल करिअर अत्यंत यशस्वी राहिले आहे, त्याने RCB साठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

  • 9/12

    ९. कगिसो रबाडा
    २०२३ च्या आयपीएल हंगामात कगिसो रबाडाला पंजाब किंग्सने खरेदी केले होते.

  • 10/12

    १०. फिल साल्ट
    आयपीएल २०२४ च्या लिलावात फिल साल्टवर कोणत्याही फ्रँचायझीने बोली लावली नव्हती परंतु नंतर KKRने त्याला जेसन रॉयच्या जागी घेतले होते.

  • 11/12

    ११. रिषभ पंत
    ऋषभ पंतने आयपीएल करिअरची सुरुवात २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाकडून केली होती. त्याला २०१६ च्या लिलावात १.९ कोटी रुपयांच्या किमतीत खरेदी करण्यात आले होते. 

  • 12/12

    १२. केएल राहुल
    केएल राहुलने आयपीएल करिअरची सुरुवात २०१३ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाकडून केली. त्यावेळी तो एक युवा खेळाडू होता आणि त्याला संधी मिळाली होती. RCB पासून सुरू झालेल्या या प्रवासात, पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स सारख्या संघांमध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे.
    हेही पाहा – चित्रपटप्रेमींसाठी ही दिवाळी आहे धमाकेदार, बॉलिवूड व साऊथमधील ‘हे’ तगडे चित्रपट होत आ… 

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSports

Web Title: Kl rahul rishabh pant to starc these 12 star players will appear in ipl 2025 mega auction spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.