Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. sanju samson birthday indian cricketer sanju and his wife charulata ramesh love story started with a facebook message vbm

Sanju Samson Birthday : फेसबुकवर पडले प्रेमात अन् पाच वर्षे डेट केल्यानंतर बांधली लग्नगाठ, जाणून घ्या संजू सॅमसनची लव्हस्टोरी

Sanju Samson Birthday Lovestory: संजू सॅमसन आज त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास प्रसंगी आम्ही तुम्हाला फेसबुकच्या माध्यमातून संजूला त्याचा जीवनसाथी कसा सापडला? हे जाणून घेणार आहोत.

November 11, 2024 13:53 IST
Follow Us
  • Sanju and his wife Charulata Ramesh love story started with a Facebook message
    1/9

    भारतीय क्रिकेट संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन आज ११ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • 2/9

    अलीकडेच संजूने आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये सलग दोन सामन्यात शतकं झळकावली होती. मात्र, तिसऱ्या डावात तो खाते न उघडताच बाद झाला. पण आज आपण त्याच्या लव्हस्टोरीबद्दल जाणून घेऊया.

  • 3/9

    संजू सॅमसनच्या पत्नीचे नाव चारुलता रमेश आहे. संजू आणि चारुलता यांची प्रेमकहाणी फेसबुकच्या माध्यमातून सुरू झाली. सोशल मीडियाचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. संजूने सोशल मीडियाचाही पुरेपूर फायदा घेतला.

  • 4/9

    रिपोर्ट्सच्या माहितीनुसार संजू आणि चारुलता तिरुअनंतपुरममधील मार इव्हानिओस कॉलेजमध्ये भेटले होते. या भेटीनंतर संजूने ऑगस्ट २०१२ मध्ये चारुलताला फेसबुकवर मेसेज केला होता.

  • 5/9

    या मेसेजनंतरच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली. लग्नापूर्वी संजू आणि चारुलता यांनी जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केले होते.

  • 6/9

    संजूने मुलाखतीत सांगितले होते की, लग्नाआधी तो आणि चारू 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते, ज्याबद्दल पालकांना माहिती नव्हती.

  • 7/9

    संजू आणि चारुलता यांचे डिसेंबर २०१८ मध्ये लग्न झाले. लग्नाला फक्त संजूचे जवळचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते.

  • 8/9

    त्याआधी त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये त्याचा वाढदिवस आला तेव्हा चारूने सर्व प्लॅनिंग करून त्याला आपल्या घरी बोलावले होते.

  • 9/9

    चारुलताने संपूर्ण घर लाईटने सजवले होते. घराच्या टेरेसवर त्याचे फोटो सजवले होते, याशिवाय एक स्क्रीन लावण्यात आली होती, ज्यावर त्याला भावनिक व्हिडिओ दाखवण्यात आला होता. जो संजू कधीच विसरु शकत नाही. (Photo Source – Charulatha Remesh Insta)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकाIND-vs-SAवाढदिवसBirthdayसंजू सॅमसनSanju Samson

Web Title: Sanju samson birthday indian cricketer sanju and his wife charulata ramesh love story started with a facebook message vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.