Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. dommaraju gukesh youngest ever world chess champion know about him spl

सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन दोम्माराजू गुकेशबद्दल १० रंजक गोष्टी जाणून घ्या

Youngest Ever World Chess Champion Dommaraju Gukesh : अवघ्या १८ व्या वर्षी दोम्माराजू गुकेशने इतिहास घडवला आहे. त्याने सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन म्हणून आपले नाव कोरले आहे. चेन्नईच्या या विद्वानाने खास कौशल्य, अचूकता आणि संयम दाखवून विद्यमान चॅम्पियन डिंग लिरेनचा पराभव करून बुद्धिबळ जगताला थक्क केले आहे. त्याच्या उल्लेखनीय विजयापलीकडील गुकेशचा प्रवास बऱ्याच आव्हानांनी…

Updated: December 13, 2024 11:38 IST
Follow Us
  • 10 Interesting Facts About Dommaraju Gukesh
    1/10

    अवघ्या १८ व्या वर्षी, गुकेश डोम्माराजूने गॅरी कास्पारोव्हचा २२ व्या वयातील चॅम्पियन टप्पा ओलांडून आतापर्यंतचा सर्वात तरुण जागतिक बुद्धिबळ चॅम्पियन बनण्याचा विक्रम मोडीत काढला.

  • 2/10

    चेन्नईच्या वेलाम्मल शाळेत खेळ शिकून गुकेशने सातव्या वर्षी बुद्धिबळाचा प्रवास सुरू केला. त्याची खेळातील प्रतिभा इयत्ता पहिलीपासूनच दिसून येत होती, त्याचे प्रशिक्षक भास्कर व्ही यांनी त्याची क्षमता तेव्हाच ओळखली.

  • 3/10

    गुकेशने केवळ बुद्धिबळावर लक्ष केंद्रित करण्यासाठी इयत्ता ४ थीनंतर औपचारिक शिक्षण सोडले. विजयानंद बुद्धिबळ अकादमीमधील त्याच्या शिस्तबद्ध दिनचर्येने कठोर प्रशिक्षणाने त्याला आज हे यश मिळवून दिले आहे. गुकेश दररोज ७० बुद्धिबळ कोडी सोडवायला घेत असे, इथूनच त्याच्या कौशल्यात मोठी प्रगती झाली.

  • 4/10

    प्रशिक्षक विष्णू प्रसन्ना यांनी गुकेशला विशिष्ट अपारंपरिक दृषटिकोनाने या खेळाकडे पाहायला शिकविले. त्यामुळे त्याची विश्लेषणात्मक आणि धोरणात्मक अचूकता वाढली.

  • 5/10

    गुकेशला पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांनी मार्गदर्शन केले आहे. वेस्टब्रिज बुद्धिबळ अकादमीमध्ये आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली गुकेशचा खेळ विकसित झाला आणि त्याला त्याचा मोठा फायदा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • 6/10

    २०१९ मध्ये गुकेश हा १२ वर्षे, ७ महिने आणि १७ दिवसांचा भारताचा सर्वात तरुण ग्रँडमास्टर बनला, त्याने जागतिक क्षेत्रात बुद्धिबळातील एक प्रतिभावान खेळाडू म्हणून त्याचे स्थान मजबूत केले.

  • 7/10

    २०२३ मध्ये, गुकेशने विश्वनाथन आनंद यांना FIDE क्रमवारीत भारताचा अव्वल क्रमांकाचा खेळाडू म्हणून मागे टाकले, ३६ वर्षांमध्ये प्रथमच एखाद्या खेळाडूने बुद्धिबळाच्या आयकॉनला मागे टाकले होते.

  • 8/10

    गुकेशसाठी प्रख्यात बुद्धिबळ विकास प्रशिक्षक पॅडी अप्टन यांची नियुक्ती केली गेली, त्यांच्या मार्गदर्शनाने त्याची मानसिक लवचिकता सुधारण्यास मदत झाली, जे त्याच्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरले.

  • 9/10

    गुकेशने १७ व्या वर्षी २०२४ मधील उमेदवारांच्या स्पर्धेत विजय मिळवला, तो आतापर्यंतचा सर्वात तरुण विजेता ठरला.

  • 10/10

    डिंग लिरेनला पराभूत केल्यानंतर गुकेशने चिनी ग्रँडमास्टरबद्दलही मनापासून आदर व्यक्त केला आणि मोठ्या दबावात सामना सुरू असताना त्याच्या महान दर्जाची आणि लवचिकतेचीही कबुली दिली आहे.
    हेही पाहा- Photos : दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेशने दिर्घकाळ प्रियकराशी बांधली लग्नगाठ; कोण आहे तिचा पती, काय करतो?

TOPICS
क्रीडाSportsबुद्धिबळ

Web Title: Dommaraju gukesh youngest ever world chess champion know about him spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.