• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. pv sindhu wedding photos indian badminton player shares beautiful pictures with husband venkat datta sai bdg

PV Sindhu Wedding Photos: पीव्ही सिंधूने इंजिनिअरबरोबर थाटला संसार! लग्नाचे फोटो पाहिलेत का? पती आहे ‘या’ प्रसिद्ध कंपनीचा डायरेक्टर

PV Sindhu Wedding Photos: भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने व्यावसायिक व्यंकट दत्ता साई याच्याबरोबर लग्नगाठ बांधली आहे. सिंधूने तिच्या लग्नसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत.

December 24, 2024 19:15 IST
Follow Us

य

  • PV Sindhu Wedding 1st Photo
    1/7

    भारताची माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती सिंधूने २२ डिसेंबर रोजी इंजिनीयर आणि व्यावसायिक व्यंकट दत्ता साईबरोबर लग्नगाठ बांधली. या लग्नाचा पहिला फोटो समोर आला होता.

  • 2/7

    लग्नसोहळ्यानंतर काही दिवसांनी आता सिंधूने त्यांच्या लग्नसोहळ्यातील काही क्षणांचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. सिंधूच्या लग्नाचे सर्व विधी दक्षिण भारतीय रितीरिवाजांनुसार पार पडले.

  • 3/7

    सिंधूने गोल्डन क्रीम रंगाची साडी परिधान केली आहे आणि दक्षिणात्य परंपरेप्रमाणे दागिनेही परिधान केले आहेत. तर तिचा नवराही पारंपारिक लग्नजोड्यात दिसत आहे.

  • 4/7

    पीव्ही सिंधू आणि व्यंकट दत्ता साई यांच्या दक्षिणात्य परंपरेमधील अक्षता अर्पण एका विधीच्या खास क्षणाचे सुंदर फोटोही तिने शेअर केले आहेत. या विधीमध्ये हळदीमध्ये मिक्स केलेले तांदूळ वर-वधू एकमेकांच्या डोक्यावर टाकतात.

  • 5/7

    पीव्ही सिंधूचा पती व्यंकट दत्ता साई हे पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक आहेत. पोसिडेक्स टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकिय संचालक जी. टी. व्यंकटेश्वर राव यांचे चिरंजीव आहेत.

  • 6/7

    फाउंडेशन ऑफ लिबरल अँड मॅनेजमेंट एज्युकेशन (FLAME) विद्यापीठातून त्यांनी लिबरल आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये डिप्लोमा पूर्ण केला.(वरील सर्व फोटो- @pvsindhu1)

  • 7/7

     इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बेंगळुरू येथून डेटा सायन्स आणि मशीन लर्निंगमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यापूर्वी २०१८ मध्ये व्यंकट दत्ता साई यांनी याच संस्थेतून अकाउंटिंग आणि फायनान्समध्ये बीबीए देखील मिळवले. (फोटो-@SachinTendulkar)

TOPICS
पी. व्ही. सिंधूPV SindhuबॅडमिंटनBadmintonमराठी बातम्याMarathi News

Web Title: Pv sindhu wedding photos indian badminton player shares beautiful pictures with husband venkat datta sai bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.