Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india wins champions trophy 2025 matt henry won golden ball cheak golden bat winner spl

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नवव्या हंगामात ‘या’ गोलंदाजाने जिंकला ‘गोल्डन बॉल’, कोण ठरला ‘गोल्डन बॅट’ विजेता?

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉल पुरस्कार मिळतो तर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला जातो.

Updated: March 10, 2025 11:22 IST
Follow Us
  • आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉल पुरस्कार मिळतो तर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला जातो. चला जाणून घेऊ यंदा गोल्डन बॉल व बॅट पटकावण्यात कोणाला यश मिळाले आहे. (Photo: Social Media)
    1/12

    आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला गोल्डन बॉल पुरस्कार मिळतो तर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला गोल्डन बॅट पुरस्कार दिला जातो. चला जाणून घेऊ यंदा गोल्डन बॉल व बॅट पटकावण्यात कोणाला यश मिळाले आहे. (Photo: Social Media)

  • 2/12

    मॅट हेन्री
    मॅट हेन्रीने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये गोल्डन बॉल जिंकला आहे. या स्पर्धेच्या नवव्या हंगामात न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज हेन्रीने चार सामन्यांत १० बळी घेतले. त्याने एकाच सामन्यात पाच बळीही घेतले. दुखापतीमुळे हेन्री भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलमध्ये खेळला नाही. (Photo: Social Media)

  • 3/12

    मोहम्मद शमी
    चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती दुसऱ्या स्थानावर आहेत आणि गोल्डन बॉल जिंकण्यापासून वंचित राहिले. दोघांनी प्रत्येकी ९ विकेट घेतल्या. शमी पाच तर चक्रवर्ती फक्त तीन सामने खेळला. (Photo: Social Media)

  • 4/12

    मिशेल सॅन्टनर
    न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरनेही या स्पर्धेच्या नवव्या मोसमात पाच सामन्यांत ९ बळी घेतले. भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/४३ होती. (Photo: Social Media)

  • 5/12

    मायकेल ब्रेसवेल
    न्यूझीलंडचा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेल तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने पाच सामन्यांत ८ विकेट घेतल्या. त्याची स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ४/२६ आहे. ब्रेसवेलने फायनलमध्ये विराट कोहलीच्या विकेटसह दोन विकेट घेतल्या. (Photo: Social Media)

  • 6/12

    कुलदीप यादव
    भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव चौथ्या स्थानावर आहे. त्याने पाच सामन्यांत ७ बळी घेतले. त्याची सर्वोत्तम कामगिरी ३/४० होती. कुलदीपशिवाय अफगाणिस्तानच्या अजमतुल्ला ओमरझाई आणि बेन बेन द्वारशुईस यांनीही प्रत्येकी ७ बळी घेतले. (Photo: Social Media)

  • 7/12

    कागिसो रबाडा
    दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा पाचव्या स्थानावर आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये तीन सामन्यांत ६ विकेट घेतल्या होत्या. लुंगी एनगिडी, विआन मुल्डर, ॲडम झाम्पा, जोफ्रा आर्चर आणि विल्यम ओ रूक या गोलंदाजांनीही प्रत्येकी सहा विकेट्स त्यांच्या खात्यात जमा केल्या. (Photo: Social Media)

  • 8/12

    गोल्डन बॅट
    रचिन रवींद्र
    न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्रने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये गोल्डन बॅट जिंकली. तो स्पर्धेच्या नवव्या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने चार सामन्यांत ६५.७५ च्या सरासरीने २६३ धावा केल्या. त्याने दोनदा शतकी खेळीही खेळली. (Photo: Social Media)

  • 9/12

    श्रेयस अय्यर
    भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सर्वाधिक धावा करणाऱ्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये ४८.६० च्या सरासरीने २४३ धावा केल्या आणि दोन अर्धशतके झळकावली. भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनलमध्ये अय्यरने ६२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली होती. तो फक्त २१ धावांमुळे गोल्डन बॅटपासून लांब राहिला. (Photo: Social Media)

  • 10/12

    बेन डकेट
    इंग्लंडचा सलामीवीर फलंदाज बेन डकेटने तीन सामन्यांत ७५.६६ च्या सरासरीने २२७ धावा केल्या. त्याने एक शतक झळकावले. दरम्यान, इंग्लंडचा संघ साखळी टप्प्यातूनच स्पर्धेतून बाहेर पडला. (Photo: Social Media)

  • 11/12

    जो रूट
    इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट पाचव्या स्थानावर आहे. त्याने तीन सामन्यांत २२५ धावा काढळ्या. रुटची सरासरी ७५.०० होती. त्याच्या बॅटमधून एक शतक आणि एक अर्धशतक आले. (Photo: Social Media)

  • 12/12

    विराट कोहली
    भारताचा स्टार क्रिकेटर किंग विराट कोहली पाचव्या स्थानावर कायम आहे. त्याने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये पाच सामन्यांमध्ये ५४.५० च्या सरासरीने २१८ धावा केल्या. त्याने एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. फायनलमध्ये चाहत्यांना कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती पण तो फक्त एक धाव करू शकला. दरम्यान, न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव करत भारताने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे तिसऱ्यांदा वर्चस्व; तगड्या किवींना रोहितसेनेची टफ फाईट…

TOPICS
आयसीसीICCक्रिकेटCricketक्रीडाSportsचॅम्पियन्स ट्रॉफीभारत विरुद्ध न्यूझीलंडIndia vs New Zealand

Web Title: India wins champions trophy 2025 matt henry won golden ball cheak golden bat winner spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.