• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. french open historic final in carlos alcaraz and jannik sinner played for 5 hours and 29 minutes the longest final photos bdg

French Open 2025: अल्काराझ-सिनरने लाल मातीच्या मैदानावर इतिहास घडवला! फ्रेंच ओपन स्पर्धेतील ऐतिहासिक सामन्यात काय घडलं?

French Open 2025: फ्रेंच ओपन फायनल २०२५ मध्ये कार्लोस अल्काराझ आणि यानिक सिनर यांच्या ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला.

June 9, 2025 10:27 IST
Follow Us
  • Carlos Alcaraz vs Jannik Sinner French Open Final 2025
    1/11

    कार्लाेस अल्काराझ फ्रेंच ओपन फायनल २०२५ चे जेतेपद पटकावत लाल मातीचा बादशाह ठरला.

  • 2/11

    जागतिक क्रमवारीतील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू यानिक सिनर आणि कार्लोस अल्काराझ यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला.

  • 3/11

    अल्काराझ आणि सिनरमधील हा अंतिम सामना फ्रेंच ओपन स्पर्धेतील एक ऐतिहासिक सामना ठरला.

  • 4/11

    जानिक सिनर वि. कार्लोस अल्काराझ मधील हा अंतिम सामना अक्षरश: साडे पाच तास सुरू होता, जो या स्पर्धेतील सर्वाधिक वेळ चालणारा सामना ठरला.

  • 5/11

    कार्लोस अल्काराझने सुरूवातीचे दोन्ही सेट गमावले होते आणि सिनर या सामन्यात पुढे होता, पण अल्काराझने काही माघार घेतली नाही आणि शेवटपर्यंत सामन्यात तगडी टक्कर दिली.

  • 6/11

    अल्काराझने हा सामना ४-६,६-७ (४-७), ६-४ (७-३), ७-६ (१०-२)अशा फरकाने जिंकला. अखेरच्या टायब्रेकरमध्ये अल्काराझने लागोपाठ ५ पॉईंट्स मिळवत सलग दुसरे ग्रँडस्लॅम आपल्या नावे केले.

  • 7/11

    जगातील नंबर वन खेळाडू इटलीचा यानिक सिनरने एकावेळी जेतेपद जिंकलाच होता पण चौथ्या सेटमध्ये तो तीन चॅम्पियनशिप पॉइंट वाचवू शकला नाही. यासह त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

  • 8/11

    फ्रेंच ओपनमधील विजयासह कार्लोस अल्काराझने राफेल नदालच्या ग्रँड स्लॅम जेतेपदाच्या संख्येशी बरोबरी केली.

  • 9/11

    अल्काराझच्या करियरमधील पाचवे ग्रँड स्लॅम आहे. राफेल नदालप्रमाणे त्याने पाचवे ग्रँडस्लॅम वय २२ वर्ष, १ महिना आणि ३ दिवस असतानाच जिंकले आहे.

  • 10/11

    अल्काराझने विजयानंतर सिनरने साडे पाच तास दिलेल्या अटीतटीच्या लढतीचं कौतुक केलं आणि तो येत्या नव्या पिढीचा आदर्श असणार आहे, असा उल्लेख केला.

  • 11/11

    अल्काराझने सामना संपेपर्यंत काही हार मानली नाही आणि सिनरला कडवी झुंज देत विजय संपादन केलाच. (वरील सर्व फोटो-@rolandgarros-X)

TOPICS
टेनिसTennisटेनिस न्यूजTennis Newsमराठी बातम्याMarathi News

Web Title: French open historic final in carlos alcaraz and jannik sinner played for 5 hours and 29 minutes the longest final photos bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.