Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. temba bavuma with son and wtc trophy aiden markram hugs wife south africa winning with celebration goes viral bdg

WTC Final: बावूमाच्या कडेवर लेक अन् हातात ट्रॉफी, मारक्रम पत्नीला मिठी मारत झाला भावुक; आफ्रिकेच्या खेळाडूंचं कुटुंबाबरोबर विजयाचं सेलिब्रेशन

South Africa WTC Win Celebration With Family: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना जिंकल्यानंतर संघाने मैदानावर कुटुंबाबरोबर केलेल्या सेलिब्रेशनचे फोटो, व्हीडिओ समोर आले आहेत.

June 14, 2025 20:52 IST
Follow Us
  • South Africa WTC Final Winning Celebration with Families
    1/11

    दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा विकेट्सने पराभव करत संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरला.

  • 2/11

    कर्णधार तेंबा बावुमाच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिका संघाने २७ वर्षांनी आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे केली आहे.

  • 3/11

    कगिसो रबाडाचे ९ विकेट्स आणि एडन मारक्रमच्या १३६ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर याचबरोबर आफ्रिकेच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर संघाने चौथ्या दिवशीच स्पर्धा आपल्या नावे केली.

  • 4/11

    २८२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना तेंबा बावुमाच्या डाव्या पायाच्या हॅमस्ट्रिंगची दुखापत सतावत असतानाही त्याने मारक्रमबरोबर उत्कृष्ट भागीदारी रचली. या भागीदारीने संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.

  • 5/11

    दक्षिण आफ्रिकेने या विजयानंतर ट्रॉफी स्वीकारत एकच जल्लोष केला. यानंतर संघाने आपल्या कुटुंबाबरोबर मैदानावर या विजयाचा आनंद साजरा केला.

  • 6/11

    सलामीला उतरलेला मारक्रम संघाला विजयासाठी ६ धावांची गरज असताना बाद झाला. संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेत तो माघारी परतला. मारक्रमच्या उत्कृष्ट शतकी खेळीसाठी तो सामन्याचा सामनावीर ठरला.

  • 7/11

    दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बावुमाचा विजयानंतर त्याच्या लेकाबरोबरचा फोटो व्हायरल होत आहे.

  • 8/11

    दक्षिण आफ्रिका संघाने ट्रॉफी स्वीकारल्यानंतर स्टेडियममध्ये विक्ट्री लॅप करतानाचे हे फोटो आहेत.

  • 9/11

    बावूमाच्या कडेवर लेक आणि हातात WTC ट्रॉफी असा हा फोटो सध्या व्हायरल होत आहे.

  • 10/11

    दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा हिरो ठरलेल्या मारक्रमने पत्नीला मिठी मारत या विजयाचा आनंद साजरा केला.

  • 11/11

    आफ्रिकेचा भारतीय वंशाचा केशव महाराज आपल्या कुटुंबाबरोबर फोटो काढताना दिसला. (वरील सर्व फोटो-ICC Instagram)

TOPICS
ऑस्ट्रेलियाAustraliaदक्षिण आफ्रिका क्रिकेट टीमSouth Africa Cricket Teamमराठी बातम्याMarathi Newsवर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३World Test Championship

Web Title: Temba bavuma with son and wtc trophy aiden markram hugs wife south africa winning with celebration goes viral bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.