-
सध्याच्या घडीला टी-२० क्रिकेटमधील पहिल्या क्रमाकांचा फलंदाज अभिषेक शर्माने ४ सप्टेंबरला २५ वा वाढदिवस साजरा केला. अभिषेक शर्मा आता आशिया कप २०२५ मध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. मात्र, त्याआधी त्याचं नाव काश्मिरच्या एका मुलीबरोबर जोडलं जात आहे.
-
अभिषेक शर्माने आयपीएलनंतर प्रसिद्धी मिळवल्यानंतर त्याला टीम इंडियात संधी मिळाली. हॅन्डसम असलेला अभिषेक शर्माचा मोठा चाहता वर्ग देखील आहे. पण अभिषेक शर्मा मात्र काश्मीरमधील एका मुलीला डेट करत असल्याची चर्चा आहे.
-
अभिषेक शर्माचं नाव जोडलं जात असलेली ही मुलगी लैला फैसल आहे. लैलाने त्याच्या विक्रमी टी-२० खेळीचं कौतुक केलं होतं, तेव्हापासून त्यांच्या नात्याच्या चर्चांना सुरूवात झाली.
-
अभिषेकच्या वाढदिवसानिमित्त लैलाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली होती, पण तिने नक्की अभिषेकसाठी ही पोस्ट शेअर केली होती का याबाबत नक्की काही माहिती नाही. तिने शेअर केलेल्या पोस्टमध्ये केकवर खेळाडूच्या हातात बॅटसह क्रिकेट पिच दिसत आहे.
-
लैला फैसलने किंग्ज कॉलेज लंडनमधून मानसशास्त्रात पदवी घेतली आहे आणि लंडन विद्यापीठातून फॅशन डिझाईन, मार्केटिंग आणि स्टायलिंगचे शिक्षण घेतले आहे. लैला ही मूळची दिल्लीची असून ती एका काश्मिरी मुस्लिम कुटुंबातील आहे
-
लैला फैसल ही तिच्या वडिलांनी २०२१ मध्ये स्थापन केलेल्या एका लक्झरी होम थिएटर आणि ऑटोमेशन कंपनी (साउंड ऑफ म्युझिक लक्झरी) मध्ये सीओओ म्हणून काम करत आहे. याशिवाय, ती एलएफएस स्टुडिओची संस्थापक म्हणूनही काम करत आहे.
-
२०२२ मध्ये, तिने तिच्या आईसोबत लैला रुही फैसल डिझाईन्स नावाचा एक कपड्यांचा ब्रँड सुरू केला. जो काश्मिरी स्टाईलमधील महिलांचे कपडे तयार करतो. (छायाचित्र – लैला फैसल इंस्टाग्राम)
अभिषेक शर्मा ‘या’ तरूणीला करतोय डेट? मॉडेल, बिझनेसवुमन अन् ब्रँडची आहे मालकीण; पाहा नेमकी आहे तरी कोण?
Abhishek Sharma Girlfriend: अभिषेक शर्माने ४ सप्टेंबरला त्याचा २५ वा वाढदिवस साजरा केला. दरम्यान तो काश्मीरमधील एका मुलीला डेट करत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. जिने त्याच्यासाठी पोस्टदेखील शेअर केली.
Web Title: Abhishek sharma rumored girlfriend who is laila faisal model businesswoman and owner of clothing brand bdg