• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राज ठाकरे
  • बच्चू कडू
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. india vs pakistan asia cup cricket match handshake controversy know what will happen in the next matches spl

Ind Vs Pak: पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन टाळण्यामागे भारताची मुत्सद्देगिरी काय? पुढील सामन्यांमध्ये पुनरावृत्ती होणार? वाचा काय घडतंय…

india vs Pakistan asia cup cricket match handshake controversy : या सामन्याला सुरुवातीपासूनच विरोध होत होता. भारताने पाकिस्तानबरोबर खेळण्यास नकार द्यावा, असे विविध मतं राजकीय व्यक्ती व विविध सामाजिक स्तरातून व्यक्त करण्यात येत होते.

Updated: September 16, 2025 13:39 IST
Follow Us
  • Ind vs Pak Handshake Controversy| Mohsin Naqvi demands referee Andy Pycroft removal Asia Cup
    1/13

    Ind vs Pak Asia Cup 2025 : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने लष्कराच्या माध्यमातून पाकिस्तानविरूद्ध सिंदूर मोहिम राबवली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष रंगला होता. काही दिवसांनी या संघर्षाला विराम मिळाला, पण त्याचे पडसाद आशिया कपमध्येही पाहायला मिळाले. (फोटो- एपी)

  • 2/13

    दोन्ही देशांच्या युद्धजन्य संघर्षानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान पहिल्यांदाच क्रिकेटच्या सामन्यात १४ सप्टेंबर २०२५ रोजी आमने-सामने आले होते. (Photo: Team India/Instagram Page)

  • 3/13

    या सामन्याला सुरुवातीपासूनच विरोध होत होता. भारताने पाकिस्तानबरोबर खेळण्यास नकार द्यावा, असे विविध मतं राजकीय व्यक्ती व विविध सामाजिक स्तरातून व्यक्त करण्यात येत होते. (Photo: Team India/Instagram Page)

  • 4/13

    दरम्यान, या सर्वात अखेर सामना पार पडला. भारताने पाकिस्तानवर सहज व दणदणीत विजय प्राप्त केला. २० षटकांच्या यंदाच्या आशिया कपमध्ये भारताने पाकिस्तानला पराभूत केलं, हा विजय भारताच्या लष्कराला समर्पित आहे असं वक्तव्यही कर्णधार सूर्यकुमार यादवने केलं. (Photo: Team India/Instagram Page)

  • 5/13

    वादाची ठिणगी
    वादाचा मुद्दा असा झाला आहे की सामन्याच्या नाणेफेकीदरम्यान, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधार सलमान आघाशी हस्तांदोलन केलं नाही आणि सामना संपल्यानंतरही हेच दृश्य पाहायला मिळालं.

  • 6/13

    सूर्यकुमार यादवने विजयी षटकार लगावला आणि तो शिवम दुबेसह थेट मैदानाबाहेर जायला निघाला. यानंतर ड्रेसिंग रूममध्ये जाताना त्याने संघातील खेळाडूंशी पारंपारिक हस्तांदोलन केलं आणि संपूर्ण संघ ड्रेसिंग रूममध्ये जात दार लावून घेतलं गेलं. पाकिस्तानचा संघ हे संपूर्ण दृश्य फक्त पाहत राहिला. (Photo: Team India/Instagram Page)

  • 7/13

    सहसा सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, परंतु भारत-पाकिस्तान सामन्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू सरळ ड्रेसिंग रूममध्ये परतले. भारतारकडून पहलगाम हल्ल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून याकडे पाहिले जात आहे. (Photo: Team India/Instagram Page)

  • 8/13

    यासाठी भारतीय खेळाडूंचे कौतुकही केले जात आहे. पण, त्याचवेळी पाकिस्तानकडून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. भारताच्या या कृतीवर पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी जहाल टीकाही केली. युद्धातल्या गोष्टी खेळात आणण्याची आवश्यकता नव्हती, असं मतं पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी व्यक्त केलं. (Photo: Team India/Instagram Page)

  • 9/13

    भारताने हस्तांदोलन न केल्याने पाकिस्तानने केली तक्रार
    भारतीय संघाने अशाप्रकारे दुर्लक्ष केल्याने पाकिस्तान संघ वैतागला व त्यांनी याबद्दल तक्रार केली. पीसीबीने DAWN.COM ला सांगितलं की, पाकिस्तान संघ व्यवस्थापक नवीन अख्तर चीमा यांनी भारतीय संघाच्या वाईट वर्तनाबद्दल अधिकृतपणे तक्रार केली आहे. पीसीबीने मॅच रेफ्रींविरुद्ध तक्रार दाखल केली आहे, कारण त्यांनी दोन्ही कर्णधारांना नाणेफेकीदरम्यान हस्तांदोलन करू नये अशी विनंती केली होती. (Photo: Social Media)

  • 10/13

    भारतीय संघाची कृती खिलाडूवृत्तीला अशोभनीय होती आणि हे अत्यंत निराशाजनक आहे. खेळात राजकारण आणणे हे खेळभावनेच्या विरोधात जाणारे आहे. भविष्यात सर्वच संघ आपला विजय अधिक योग्य पद्धतीने साजरा करतील अशी आशा आहे. – मोहसीन नक्वी, ‘पीसीबी’ आणि ‘एसीसी’चे अध्यक्ष. (Photo: Team India/Instagram Page)

  • 11/13

    बहिष्कारा’चा निर्णय
    पाकिस्तानशी सामना खेळत असल्याच्या मुद्द्यावर विरोेधी पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. पहलगाम हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांसह समाजमाध्यमांवरूनही याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने हा ‘बहिष्कारा’चा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून समजते आहे. (Photo: Team India/Instagram Page)

  • 12/13

    दरम्यान, स्पर्धेत भारताचा आणखी दोन वेळा (सुपर फोर आणि उपांत्य/अंतिम सामना) पाकिस्तानशी सामना होऊ शकतो. मात्र, त्यावेळीही भारतीय संघ रविवारसारखीच भूमिका कायम ठेवेल, असे सांगण्यात येते आहे. भारताला जेतेपद मिळाले तर चषक स्वीकारण्यासाठी भारतीय खेळाडू पाकिस्तानच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्यासपीठावर जाणार नाही, असेही समजते. (Photo: Team India/Instagram Page)

  • 13/13

    सूर्याचे हे वक्तव्य चर्चेत
    आम्ही केवळ खेळण्यासाठी मैदानावर आलो होतो. आम्हाला त्यांना प्रत्युत्तर द्यायचे होते. काही गोष्टी खिलाडूवृत्तीपेक्षा मोठ्या असतात. आम्ही हा विजय ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे राबविणाऱ्या सशस्त्र दलांना समर्पित करतो. भारतीय संघ पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. – सूर्यकुमार यादव, भारताचा कर्णधार (Photo: Team India/Instagram Page)

    हेही पाहा- ‘इथे’ साकारतोय छत्रपती संभाजी महाराजांचा १०० फुटांचा भव्य पुतळा, ‘इतके’ कोटी होणार खर्च

TOPICS
आशिया चषक २०२५Asia Cup 2025क्रिकेटCricketपाकिस्तानPakistanभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: India vs pakistan asia cup cricket match handshake controversy know what will happen in the next matches spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.