-
IND vs PAK Asia Cup 2025 Final: भारतीय संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानवर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत आशिया चषक आपल्या नावे केला आहे. (AP Photo/Altaf Qadri)
-
भारताने नाणेफेक जिंकत पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केले. (AP Photo/Altaf Qadri)
-
तिलक वर्मा भारताच्या विजयाचा हिरो ठरला. रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला. (AP Photo/Altaf Qadri)
-
विजयासह सर्वात मोठी गोष्ट म्हणजे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे. (AP Photo/Altaf Qadri)
-
भारताला अखेरच्या षटकात ६ चेंडूत १० धावांची गरज होती. (AP Photo/Altaf Qadri)
-
१९व्या षटकात फहीम अश्रफने अखेरच्या चेंडूवर शिवम दुबेला झेलबाद केले. यानंतर अखेरच्या षटकासाठी रिंकू सिंग फलंदाजीला आला. (AP Photo/Altaf Qadri)
-
पहिल्या चेंडूवर तिलक-रिंकूने २ धावा केल्या. तिलकने दुसऱ्या चेंडूवर षटकार लगावला आणि इथेच भारताचा विजय पक्का झाला. त्यानंतर संपूर्ण स्पर्धा न खेळलेल्या रिंकू सिंहने फक्त १ चेंडू खेळत विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. (AP Photo/Altaf Qadri)
-
भारताने आशिया चषकात पाकिस्तानचा ३ वेळा पराभव करत हॅटट्रिक नोंदवली आहे. (AP Photo/Altaf Qadri)
-
पाकिस्तानने दिलेल्या १४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरूवात प्रचंड वाईट झाली. भारताने पॉवरप्लेमध्ये ३ मोठ्या विकेट्स गमावल्या होत्या. (AP Photo/Altaf Qadri)
भारताने पाकिस्तानला नमवत पटकावलं विक्रमी ९वं आशिया चषकाचं जेतेपद, सामन्यातील खास क्षणांचे फोटो
रिंकू सिंहने अखेरच्या चेंडूवर विजयी चौकार लगावत भारताचा विजय पक्का केला.
Web Title: Asia cup 2025 final india win for the 9th time defeat pakistan by 5 wickets see match photos sdn