-
आशिया चषक संपताच लगेच महिला वनडे वर्ल्डकपला सुरूवात झाली आहे. भारताकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. या स्पर्धेत भारतासह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका हे ८ संघ सहभागी झाले आहेत.(फोटो-BCCI)
-
बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया)-बेथ मूनी ऑस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजांपैकी एक आहे. मूनी २०२५ मध्ये कमालीच्या फॉर्मात आहे. यंदाच्या प्रत्येक वनडे सामन्यात तिने दुहेरी आकडा गाठला आहे आणि भारताविरुद्ध महिलांच्या वनडेतल्या सर्वात वेगवान शतकांपैकी एक झळकावलं आहे. आणि शांत डोक्याची खेळाडू ठरली आहे. नुकत्याच भारताविरूद्ध झालेल्या मालिकेत तिने तीन डावांत तब्बल २३३ धावा ठोकत दर्जेदार गोलंदाजीवर वर्चस्व गाजवलं. तिचं मोठं बळ म्हणजे डावाचं नियोजन, त्यामुळे ती दबावाच्या प्रसंगी संघासाठी महत्त्वाची ठरते.(फोटो-एक्सप्रेस फोटो)
-
नताली स्किव्हर ब्रंट (इंग्लंड)-इंग्लंडची कर्णधार ही अष्टपैलू खेळाडू तर आहे पण संघाची सर्वात विश्वासार्ह फलंदाज आहे. यंदा तिने वनडेत चार अर्धशतकं झळकावली आहेत आणि सध्या ती आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिच्या कारकिर्दीतील सरासरी ४० पेक्षा जास्त असून स्ट्राइक रेट ९० च्या वर आहे, ज्यामुळे ती संघाचा डाव सावरूही शकते आणि गरज पडल्यास गतीही देऊ शकते.(फोटो-एक्सप्रेस फोटो)
-
स्मृती मानधना (भारत)-स्मृती मानधाना या स्पर्धेत तिच्या सर्वोच्च फॉर्मसह उतरत आहे. यंदा तिने पुन्हा एकदा आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलं आहे. २०२५ मध्येच तिने ६० च्या सरासरीसह ८०० हून अधिक धावा केल्या आहेत. तिच्या चार शतकांपैकी एक म्हणजे सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७७ धावांची खेळी. आतापर्यंतच्या कारकिर्दीत ती ४८००+ वनडे धावसंख्या गाठली असून मिताली राजनंतर भारताला मिळालेली सर्वात विश्वासार्ह सलामीवीर म्हणून ती ओळखली जाते.(फोटो-बीसीसीआय)
-
जॉर्जिया प्लिमर (न्यूझीलंड)-प्लिमर अजूनही करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे, पण तिने या सुरूवातीलाच मॅचविनिंग खेळी केल्या आहेत. मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध केलेल्या तिच्या ११२ धावांच्या शतकाने मालिकाविजयाचा पाया रचला. त्यानंतर तिने न्यूझीलंड अ साठी इंग्लंड अ विरुद्ध आणखी एक शतक झळकालं. केवळ २० व्या वर्षी ती न्यूझीलंडची गेल्या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक धावसंख्या करणारी फलंदाज ठरली आहे.(एक्सप्रेस फोटो)
-
मारीजान काप (दक्षिण आफ्रिका)-मारीजानने विश्रांतीनंतर पुन्हा वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं आहे. सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्ध तिने नाबाद १२१ धावा केल्या. २००९ पासून १३० हून अधिक वनडे खेळलेली ही अनुभवी खेळाडू दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीसाठी महत्त्वपूर्ण ठरली.(एक्सप्रेस फोटो)
-
हर्षिता समरविक्रमा (श्रीलंका)-श्रीलंकेच्या फलंदाजीचा सर्वात विश्वासार्ह भाग हर्षिता ठरली. गेल्या वर्षी ती संघाची वनडेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आणि २०२५ मध्ये तिने आतापर्यंत चार अर्धशतकं झळकावली आहेत, ज्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची ७७ धावांची खेळी विशेष उल्लेखनीय आहे.(फोटो-Harshita Samarwickrama Instagram)
-
सिद्रा अमिन (पाकिस्तान)-सिद्रा अमिननं २०२५ मध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत जोरदार फॉर्म दाखवला आहे. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिने सलग दोन शतकं झळकावली. यंदाच्या सात वनडे सामन्यांपैकी काही सामन्यांमध्ये तिने ५० अधिक धावांची खेळी केली आणि पाकिस्तानसाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे.(फोटो-ICC)
-
शर्मिन अख्तर (बांगलादेश)-२०२५ मध्ये शर्मिन अख्तर ही बांगलादेशची सर्वात सातत्यपूर्ण फलंदाज ठरली आहे. पात्रता फेरीतल्या आठ डावांपैकी सात वेळा तिने २० अधिक धावांची खेळी केली आहे. थायलंडविरुद्धच्या सामन्यात नाबाद ९४ धावांची खेळी करून तिने मालिकेचा शेवट केला. वयाच्या २९ व्या वर्षी ती संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे आणि गेल्या वर्षभरात बांगलादेशसाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे.(फोटो-ICC)
WCW 2025: महिला वनडे वर्ल्डकपला भारतात सुरूवात; स्मृती, स्किव्हर ब्रंटसह हे ८ फलंदाजांवर सर्वांच्या नजरा
Women’s World Cup 2025: महिला वनडे वर्ल्डकप २०२५ ला आजपासून सुरूवात झाली आहेय. भारतीय संघ स्पर्धेतील पहिला सामना श्रीलंकेविरूद्ध खेळत आहे. या स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी ८ फलंदाजांवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.
Web Title: Womens cricket world cup 8 batters to shine smriti mandhana beth mooney natalie sciver brunt bdg