-
टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. इंग्लंड दौऱ्याच्या अगदी आधी, त्याने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आता रोहित फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. पण त्याच्याकडे संघाचे कर्णधार पदही नसणार आहे.
-
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असून बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे. दरम्यान आज आपण रोहित शर्माच्या कर्णधारपदाच्या रेकॉर्डवर जर एक नजर टाकूया..
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयसीसी स्पर्धांपर्यंत, रोहित शर्माने सर्वत्र आपले कौशल्य सिद्ध केले आहे. त्याने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक आणि २०२५ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली आहे.
-
पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या रेकॉर्डवर एक नजर टाकूया, असे कर्णधार ज्यांनी किमान १०० सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. या यादीत रिकी पॉन्टिंग, स्टीव्ह वॉ आणि विराट कोहली सारखे दिग्गज कर्णधार आहेत, परंतु ते सर्व रोहित शर्मापेक्षा मागे आहेत.
-
रोहित शर्माचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विजयाचा टक्का ७२.५ आहे, तर रिकी पॉन्टिंग ६७.९ सह दुसऱ्या, असगर अफगाण ६७.८ सह तिसऱ्या, स्टीव्ह वॉ ६६.३ सह चौथ्या, हँसी क्रोनिए ६६ सह पाचव्या आणि विराट कोहली ६३.४ टक्केसह सहाव्या स्थानावर आहे.
-
आयसीसी स्पर्धांमध्ये तर रोहित शर्माचा रेकॉर्ड आणखी प्रभावी आहे. तो ८७.१ च्या विजयी टक्केवारीसह किमान २० सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल आहे. २००३ आणि २००७ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा रिकी पॉन्टिंग (७८.४) दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
एकदिवसीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून रोहित शर्माची विजयाची टक्केवारी पहिल्या क्रमांकाच्या रँकिंगपेक्षा खूपच कमी होती. त्याच्या ७७.२७ च्या विजयाच्या टक्केवारीमुळे तो किमान ५० एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत क्लाइव्ह लॉईड (७७.७१) पहिल्या क्रमांकावर आहेत.
नेतृत्व म्हटलं की रोहित शर्माच; आकडेवारी एकदा पाहाच
रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले असून बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी शुभमन गिलची नवीन कर्णधार म्हणून निवड केली आहे.
Web Title: Rohit sharma captaincy record left behinde virat kohli ricky ponting marathi rak