Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. cm eknath shinde visit to balasaheb thackeray memorial on gurupornima photos rmm

Photos : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट, गुरूपोर्णिमेनिमित्त केलं वंदन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन वंदन केलं आहे.

July 13, 2022 14:47 IST
Follow Us
  • शिवसेनेच्या परंपरेत गुरूपोर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना, गुरूपोर्णिमेच्या दिवशी हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असायचे.
    1/8

    शिवसेनेच्या परंपरेत गुरूपोर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना, गुरूपोर्णिमेच्या दिवशी हजारो शिवसैनिक मातोश्रीवर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करत असायचे.

  • 2/8

    आज त्यांच्या मृत्यूनंतर देखील हजारो शिवसैनिक दरवर्षी त्यांच्या स्मृतीस्थळी जाऊन वंदन करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आज बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी भेट देऊन वंदन केलं आहे.

  • 3/8

    यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणाले “आम्ही महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहोत.”

  • 4/8

    दरवर्षी गुरूपोर्णिमेला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आम्ही सगळेजण नतमस्तक होत असतो. गुरूपोर्णिमेला प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात वेगळी भावना असते.

  • 5/8

    आज स्मृतीस्थळावर वंदन करताना आमच्या मनात त्यांच्याबद्दल श्रद्धा, भावना आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच एक सामान्य कार्यकर्ता आणि शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला.

  • 6/8

    बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला विचार पुढे नेण्याचा प्रयत्न मी आणि माझ्यासोबतचे ५० आमदार करत आहेत. बाळासाहेबांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम केलंय.

  • 7/8

    राज्याचा सर्वांगीण विकास आमचं युती सरकार करेल. त्यामुळे शेतकरी, कामकरी, वारकरी, कष्ठकरी आणि सर्व समाज घटकांचा उत्कर्ष आणि राज्याचा विकास हेच आमचं ध्येय आहे.

  • 8/8

    “यानंतर आता मी धर्मवीर आनंद दीघे यांच्या शक्तीस्थळाला विनम्र आभिवादन करायला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हजारो शिवसैनिक न चुकता ठेंभी नाक्यावर आनंद दीघे साहेबांना वंदन करण्यासाठी येत असतात. मी देखील जात आहे,” अशी माहितीही शिंदे यांनी दिली. (सर्व फोटो सौजन्य- CMO Maharashtra)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeबाळासाहेब ठाकरेBalasaheb ThackerayशिवसेनाShiv Sena

Web Title: Cm eknath shinde visit to balasaheb thackeray memorial on gurupornima photos rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.