Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. best laptop under 30000 with ssd in india know price features and specifications prp

Laptop Under 30000: वेगवान प्रोसेसर आणि SSD सह सर्वात बेस्ट लॅपटॉप

तुम्हीही कमी किमतीत जलद प्रक्रिया आणि लांबलचक बॅटरी असलेला लॅपटॉप शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची आहे.

August 21, 2022 20:22 IST
Follow Us
  • करोनाच्या काळापासून स्मार्टफोनसह लॅपटॉपची मागणीही झपाट्याने वाढली आहे. घरून काम करण्यापासून मुलांच्या ऑनलाइन अभ्यासापर्यंत लॅपटॉपची गरज आहे.
    1/15

    करोनाच्या काळापासून स्मार्टफोनसह लॅपटॉपची मागणीही झपाट्याने वाढली आहे. घरून काम करण्यापासून मुलांच्या ऑनलाइन अभ्यासापर्यंत लॅपटॉपची गरज आहे.

  • 2/15

    अशा स्थितीत केवळ महागडे लॅपटॉपच विकत घेणे आवश्यक नाही, आजकाल बाजारात चांगले स्पेसिफिकेशन आणि वेगवान प्रोसेसर असलेले लॅपटॉप कमी किमतीत उपलब्ध आहेत. (Photo: Freepik)

  • 3/15

    तुम्हीही कमी किमतीत जलद प्रक्रिया आणि लांबलचक बॅटरी असलेला लॅपटॉप शोधत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची आहे. या रिपोर्टमध्ये, आम्ही तुम्हाला ३०,००० रुपयांच्या आत सर्वोत्तम SSD स्टोरेज लॅपटॉपबद्दल सांगणार आहोत. चला जाणून घेऊया. (फाइल फोटोः unsplash.com)

  • 4/15

    Infinix X1 Slim XL21 : Infinix X1 Slim XL21 सीरीज लॅपटॉप हा ३० हजारांपेक्षा कमी किमतीत येणारा एक चांगला ऑप्शन आहे. या लॅपटॉपमध्ये १४ इंच फुल एचडी प्लस स्क्रीन आहे, जी १९२०x १०८० पिक्सेल रिझोल्यूशन आणि ३०० निट्स ब्राइटनेसमध्ये उपलब्ध आहे. (Image credit: Anuj Bhatia/Indian Express)

  • 5/15

    लॅपटॉपला Intel Core i3 10th Gen प्रोसेसर आणि ८ GB LPDDR4X रॅमसह २५६ GB SSD स्टोरेज मिळते. Infinix X1 Slim XL21 मध्ये Windows 11 सपोर्ट देखील देण्यात आला आहे. (Image credit: Anuj Bhatia/Indian Express)

  • 6/15

    तसेच, लॅपटॉपमध्ये ड्युअल स्पीकर आणि ११ तासांपर्यंत बॅटरी बॅकअपसह स्लिम डिझाईन आहे. हा लॅपटॉप फ्लिपकार्टवरून २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. (Image credit: Anuj Bhatia/Indian Express)

  • 7/15

    ASUS VivoBook 14 : Asus कडून येणारा हा लॅपटॉप स्टायलिश डिझाईनसह येतो. यात १५.६ इंच फुल एचडी प्लस स्क्रीन आहे, जी १३६६ x ७६८ पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. (Express Photo)

  • 8/15

    लॅपटॉपला ड्युअल कोर Ryzen 3 3250U प्रोसेसर आणि ८ GB LPDDR4X रॅमसह २५६ GB SSD स्टोरेज मिळते. लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्ट आणि दीर्घ बॅटरी लाइफ दिसत आहे. Express Photo)

  • 9/15

    लॅपटॉपचे वजन १.८० किलो आहे. त्याची किंमत ३२,९९० रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरून डिस्काउंटनंतर ३० हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. (Express Photo)

  • 10/15

    Acer One 14 Business Laptop : Acer’s One 14 हा देखील या किमतीच्या टप्प्यावर एक टिकाऊ लॅपटॉप आहे. Acer One 14 Business लॅपटॉपमध्ये १४ इंचाची HD+ स्क्रीन आहे, जी १३६६x७६८ पिक्सेल रिझोल्यूशनसह येते. (Photo: Amazon)

  • 11/15

    यात AMD Ryzen 3 3250U प्रोसेसर आणि AMD Radeon ग्राफिक्स आहेत. लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्टसह २५६ GB SSD स्टोरेज आणि ८ GB LPDDR4X रॅम आहे. (Photo: Amazon)

  • 12/15

    यासोबतच सर्व आवश्यक पोर्ट्स ड्युअल इनबिल्ट माइकसह उपलब्ध आहेत. Amazon वरून हा लॅपटॉप २९,९९० रुपयांना खरेदी करता येईल. (Photo: Amazon)

  • 13/15

    Redmi Book 15 : स्मार्टफोन ब्रँड Redmi कडून येणारा Redmi Book 15 लॅपटॉप देखील या किमतीत एक उत्तम ऑप्शन असू शकतो. या लॅपटॉपमध्ये १५.६ इंच फुल एचडी प्लस स्क्रीनसह Intel Core I3 11th Gen प्रोसेसर आहे. (Image Source: Redmi India)

  • 14/15

    लॅपटॉपमध्ये ८ GB LPDDR4X RAM सह २५६ GB SSD स्टोरेज आहे. लॅपटॉपमध्ये Windows 11 सपोर्ट आहे आणि १० तासांपर्यंत बॅटरी लाइफ आहे. लॅपटॉपचे वजन १.८ किलो आहे. (Image Source: Weibo)

  • 15/15

    Redmi Book 15 ची किंमत ३१,९९० रुपये आहे, परंतु Amazon वर डिस्काउंट दिल्यानंतर ते ३० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येईल. (Express Photo)

TOPICS
तंत्रज्ञानTechnology

Web Title: Best laptop under 30000 with ssd in india know price features and specifications prp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.