-
हल्ली सायबर गुन्ह्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. अशातच, आपल्यासोबत अशी कोणतीही घटना घडू नये असे प्रत्येकालाच वाटत असते. (फोटो : Freepik)
-
आता आपण आपल्या आधार, पॅन किंवा मतदार आयडीवर सध्या किती मोबाइल सिम सक्रिय आहेत हे सहज शोधू शकतो. (फोटो : Freepik)
-
दूरसंचार विभागाने नुकतेच एक पोर्टल लाँच केले आहे, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयडीवर किती मोबाईल क्रमांक नोंदवले आहेत हे शोधू शकाल. (फोटो : Pixabay)
-
याच्या मदतीने अनावश्यक मोबाईल नंबर आपण बंद करू शकतो. फसवणुकीपासून लोकांना वाचवण्यासाठी सरकारने असे पाऊल उचलले आहे. (फोटो : Freepik)
-
डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन (DoT) च्या या पोर्टलचे नाव टेलिकॉम अॅनालिटिक्स फॉर फ्रॉड मॅनेजमेंट अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन (TAFCOP) आहे. काही राज्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात करण्यात आली आहे. (tafcop.dgtelecom.gov.in)
-
या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आयडीवर किती मोबाईल कनेक्शन चालू आहेत हे कळू शकेल आणि मग तुम्ही त्यानुसार कारवाई करू शकाल. (फोटो : Freepik)
-
यासाठी सर्व प्रथम https://tafcop.dgtelecom.gov.in/ वर जा. यानंतर येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. (फोटो : Pixabay)
-
त्यानंतर तुम्ही रिक्वेस्ट ओटीपी बटणावर क्लिक करा. यानंतर तुमच्या नंबरवर एक ओटीपी येईल. (फोटो : Pixabay)
-
ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या आयडीवरून चालणारे सर्व मोबाइल नंबर दाखवले जातील. (फोटो : Pixabay)
-
तुम्ही वापरत नसलेल्या नंबरसाठी चेक बॉक्सवर क्लिक करा आणि ‘हे माझे नाही वर’ (This is not my) टॅप करा. (फोटो : Pixabay)
-
जर तुमच्याकडे सर्व नंबर असतील तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही.
-
जर तुमच्याकडे सर्व नंबर असतील तर तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. (फोटो : Pixabay)
Photos : तुमच्या ओळखपत्रावर कोणी दुसरी व्यक्ती तर Sim Card वापरत नाही ना? असं करा ब्लॉक
आता आपण आपल्या आधार, पॅन किंवा मतदार आयडीवर सध्या किती मोबाइल सिम सक्रिय आहेत हे सहज शोधू शकतो.
Web Title: Does anyone else is using the sim card on your identity card block it using these steps pvp