Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. thinking of getting an iphone 14 know the features price in india launch date and more pvp

iPhone 14 घेण्याचा विचार करताय? जाणून घ्या फीचर्स, भारतातील किंमत, लॉंच डेट आणि बरंच काही…

७ सप्टेंबरला झालेल्या अ‍ॅपल लाइव्ह इव्हेंटमध्ये आयफोन १४ सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना कोणते नवीन फीचर्स मिळणार आहेत ते जाणून घेऊया.

September 8, 2022 12:26 IST
Follow Us
  • iPhone 14 series features price in India launch date
    1/16

    अ‍ॅपलचा लाइव्ह इव्हेंट ८ सप्टेंबरला मध्यरात्री १२.३० वाजता संपन्न झाला. यावेळी आयफोन १४ सह नवीन वॉच सीरिज ८ आणि नेक्स्ट जनरेशन एअरपॉड्स प्रो यांचे अनावरण झाले. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कुक यांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.

  • 2/16

    ७ सप्टेंबरला झालेल्या अ‍ॅपल लाइव्ह इव्हेंटमध्ये आयफोन १४ सीरिजची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये वापरकर्त्यांना अधिक मोठा डिस्प्ले मिळणार आहे.

  • 3/16

    ए१५ बायोनिक प्रोसेसर आयफोन १४ मध्ये असणार आहे. हा सर्वांत वेगवान प्रोसेसर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.

  • 4/16

    फोनच्या कॅमेऱ्यामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये १२ एमपीचा मुख्य कॅमेरा असेल, तर पुढील कॅमेरामध्ये प्रथमच ऑटोफोकसची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे अतिशय अंधुक प्रकाशातही छायाचित्र व्यवस्थित टिपता येणार.

  • 5/16

    आतापर्यंतचा सर्वात मोठ्या क्षमतेचा कॅमेरा अ‍ॅपलने आयफोन १४ मध्ये दिला आहे. आयफोन १४ प्रोचा कॅमेरा ४८ मेगा पिक्सेलचा असणार आहे. यामुळे आधीच्या आयफोनच्या तुलनेत आता अंधुक प्रकाशामध्येही स्पष्ट छायाचित्रे काढता येणार आहेत.

  • 6/16

    टेलिफोटो ही विशेष सुविधा देण्यात आली आहे. हा कॅमेरा क्वाड पिक्सल सेन्सर्ससहीत असेल हे ही या कॅमेराचं वैशिष्ट्य असेल.

  • 7/16

    फोर के सपोर्टसह सिनेमॅटिक मोडही या फोनमध्ये उपलब्ध आहे.

  • 8/16

    आयफोनमध्ये सामान्य सीमकार्ड नसणार. ई-सीमची ॲपलकडून घोषणा. फोनमध्ये सीम ट्रेच उपलब्ध नसणार. सध्या तरी ही सुविधा फक्त अमेरिकेपुरती मर्यादित ठेवण्यात आली आहे.

  • 9/16

    आयफोन १४ मध्येही अ‍ॅपल वॉच प्रमाणेच अपघात ओळखून आपत्कालीन यंत्रणांशी संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

  • 10/16

    अतिदुर्गम भागात मोबाईल संपर्क तुटल्यास सॅटेलाईटद्वारे संपर्क साधण्याची सुविधा मिळणार आहे. या सुविधेचा फायदा डोंगरदऱ्यांमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांच्या बचावकार्यात होऊ शकतो.

  • 11/16

    आयफोन १४ हा १६ सप्टेंबरपासून ग्राहकांसाठी बाजारपेठेत उपलब्ध होणार.

  • 12/16

    आयफोन १४ प्लस ७ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार.

  • 13/16

    आयफोन प्रोमध्ये नोटिफिकेशन डिस्प्लेमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आला आहे. नोटिफिकेशन अलर्ट केवळ वरच्या छोट्या पट्टीत दिसणार.

  • 14/16

    या पाच रंगांमध्ये आयफोन १४ सीरिज उपलब्ध असणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच जांभळ्या रंगाचा समावेश करण्यात आला आहे.

  • 15/16

    आयफोनच्या किंमतीची घोषणा

  • 16/16

    भारतामध्ये आयफोन १४ची किंमत ७९,९०० रुपयांपासून सुरू होते, तर आयफोन १४ प्लसची किंमत ८९,९०० रुपये आहे. आयफोन १४ प्रोची किंमत १,२९,९०० रुपये आहे तर आयफोन १४ प्रो मॅक्सची किंमत १,३९,९०० रुपये आहे.

TOPICS
अ‍ॅपलAppleतंत्रज्ञानTechnology

Web Title: Thinking of getting an iphone 14 know the features price in india launch date and more pvp

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.