-
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.
-
चॅट जीपीटीचे इंग्रजी भाषेतील पूर्ण रूप म्हणजे “चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर” आहे. हे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. जे एक प्रकारचे चॅट बॉट आहे.
-
उद्योगपती एलॉन मस्क हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. मस्क आणि चॅटजीपीटीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली.
-
Chat GPT ला ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लाँच करण्यात आले होते. याचे अधिकृत संकेतस्थळ chat.openai.com आहे.
-
चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहेत.
-
आपल्याला एखादी माहिती हवी असली की आपण जसं गुगलवर सर्च करतो तसंच तुम्ही या बॉटला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो लगेच एका सेकंदात देतो. चॅट जीपीटीचा आपण एक प्रकारे शोध इंजिनचा प्रकार म्हणून सुद्धा विचार केला तर त्यातही काही हरकत नसावी.
-
चॅट जीपीटी सध्या केवळ इंग्रजी भाषेत वापरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. मात्र, पुढे जाऊन इतर भाषांनाही जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
-
चॅट जीपीटीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, जेव्हा वापरकर्ता चॅट जीपीटीच्या सर्च इंजिवर काहीही शोधतो तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचे संपूर्ण डिटेल्स उत्तर मिळते. म्हणजेच त्याला त्याच्या प्रश्नाची संपूर्ण तपशीलवार माहिती मिळते.
-
ओपन एआयने कुठलेही मुल्य न घेता चॅट जीपीटी फ्रीमध्ये आँनलाईन उपलब्ध करून दिले आहे. ‘चॅट जीपीटी’ने जानेवारीमध्ये १०० मिलियन युजर्सचा टप्पा गाठला आहे. (Photo-संग्रहित छायाचित्र\financialexpress)
ढाब्यावर जेवणासाठी थांबलेल्या सैनिकांना पाहून लोकांनी केलं असं काही की….; VIDEO पाहून तुमचीही छाती अभिमानाने फुलेल