-
व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम या माध्यमांचा वापर वापरकर्त्यांसाठी अधिक सुरळीत करण्यासाठी मेटा ही कंपनी आपल्या ॲप्समध्ये सातत्याने विविध अपडेट्स आणि फीचर्स घेऊन येत असते. कधी ते अपडेट्स ॲप्सची सुरक्षा वाढवण्याचे काम करत असतात, तर काही ‘हिडन’ फीचरमुळे वापरकर्त्यांना मजेशीर गोष्टींचा वापर करण्यास मिळत असतो. [Photo credit – Freepik]
-
अशाच एका इन्स्टाग्रामच्या हिडन फीचरबद्दल इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. त्या फीचरच्या मदतीने आता हे ॲप वापरणारी व्यक्ती चॅट करताना एक भन्नाट असा गेम खेळू शकते, असे समोर आलेले आहे. मात्र, आता हा गेम नेमका कुठे शोधायचा, कसा खेळायचा आणि हे हिडन फीचर कसे शोधायचे हे आपण पाहू. [Photo credit – Freepik]
-
सर्वप्रथम इन्स्टाग्राम ॲप सुरू करावे. आता कुणाच्याही किंवा स्वतःच्या चॅटबॉक्समध्ये जावे. [Photo credit – Freepik]
-
आता आपण एखाद्याला जसे इमोजी/स्मायली पाठवतो, त्याप्रमाणे कोणताही एक इमोजी सेंड करावा. [Photo credit – Freepik]
-
आता सेंड केलेल्या इमोजीवर क्लिक करा. तुमचा पॉंग हा गेम सुरू होईल. [Photo credit – Freepik]
-
या खेळात स्क्रीनवर तुम्ही पाठवलेला इमोजी एखाद्या चेंडूप्रमाणे फिरेल. तो जसा खाली येऊ लागेल तसे तुम्हाला स्क्रीनवर दिसणाऱ्या काळ्या रंगाच्या बोर्डने झेलायचा आहे. [Photo credit – Freepik]
-
हा खेळ खेळताना तुमचा झालेला स्कोअर फोनच्या उजव्या कोपऱ्यात दिसत राहील. तसेच तुम्ही खेळातून आऊट म्हणजेच बाद झाल्यानंतर, तुमचा हायस्कोरदेखील सेव्ह राहणार आहे. [Photo credit – Freepik]
Instagram वर गेम्स खेळायचा आहे? मग हे ‘हिडन’ फीचर वापरण्यासाठी पाहा, ‘या’ स्टेप्स
मेटाच्या इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांना गेमदेखील खेळता येत आहे. हे हिडन फीचर नेमके कसे वापरायचे ते पाहा.
Web Title: How to play game with instagram emoji check out this amazing hidden feature dha