• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • वाशिम
    • बुलढाणा
  • देश-विदेश
  • IPL
    • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
    • इन्फ्रास्ट्रक्चर
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • कायदा
    • राजकारण
    • इतिहास
    • पर्यावरण
    • अर्थकारण
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • करिअर
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • आजचे भविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • ट्रेंडिंग
    • रेसिपी
    • लाइफस्टाइल
    • ऑटो
    • तंत्रज्ञान
    • FYI
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • चतुरा
  • फोटो
    • वेब स्टोरीज
    • व्हिडिओ
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता प्रीमियम
  • IPL 2025 Quiz Special
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. technology gallery
  4. apple event 2024 photos apple iphone 16 series apple watch series 10 airpods 4 launch ndj

Apple Event 2024 Photos : iPhone16 सीरीजपासून ॲपल एअरपॉड्सपर्यंत; जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर…

ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लाँच झाले, त्यांचे नवीन फीचर्स काय असणार, तसेच त्यांची भारतात किंमत काय असणार त्याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात.

September 10, 2024 12:45 IST
Follow Us
  • Apple Event 2024 Photos
    1/15

    आयफोन निर्माता ॲपलने या वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट ९ सप्टेंबर २०२४ रोजी सोमवारी स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया येथील मुख्यालयात पार पडला. ॲपलने या इव्हेंटमध्ये नवीन फ्लॅगशिप डिव्हाइसेस लाँच केले. Apple ‘इट्स ग्लोटाइम’ अशी या इव्हेंटची टॅगलाइन होती. या कार्यक्रमाला अनेक तंत्रज्ञान प्रेमींची हजेरी सुद्धा लावली होती. (Photo : Apple Hub/X)

  • 2/15

    या इव्हेंटमध्ये ॲपल वॉच १०, आयफोन १६, आयफोन प्लस १६, आयफोन प्रो १६, आयफोन मॅक्स १६, ॲपल वॉच एसई, ॲपल वॉच अल्ट्रा २, एअरपॉड्स ४ लाँच करण्यात आला आहे. ॲपलच्या ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटमध्ये कोणते प्रोडक्ट लाँच झाले, त्यांचे नवीन फीचर्स काय असणार, तसेच त्यांची भारतात किंमत काय असणार त्याबद्दल या लेखातून सविस्तर जाणून घेऊयात. (Photo : Apple Hub/X)

  • 3/15

    ॲपल वॉच १० (Apple Watch Series 10)
    ॲपलच्या (Apple) ‘इट्स ग्लोटाइम’ इव्हेंटची सुरुवात इंटेलिजन्ट ॲपल वॉचने १० ने झाली. हे वॉच तुम्हाला तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या वॉचमध्ये तुम्हाला मोठा डिस्प्ले, स्क्रीनवरचा मजकूर वेगात वाचता यावा यासाठी स्क्रीन एरिआ ३० टक्क्यांनी वाढवला सुद्धा आहे. ॲपल वॉचवर टाइप करणेही सोप्पे होणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 4/15

    ॲपल वॉच १० मध्ये जेट ब्लॅक फिनिश, ॲल्यिमिनियम अलॉयमधील बॉडी, आकार, रचना आणि वजन सारे काही नवीन असणार आहे. तसेच स्पीकरचा आकार ३० टक्क्यांनी कमी पण तरीही अगदी स्पष्ट ऐकू येईल असा देण्यात आला आहे. तर सगळ्यात महत्वाचे आणि युजर्ससाठी उपयोगी असे फास्टेट चार्जिंक ॲपल वॉच ३० सेकंदात ८० टक्के चार्जिंग करून देणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 5/15

    याचबरोबर ॲपल वॉच १० ला टायटॅनियम बॉडी असणार आहे. हे वॉच तुमच्या निद्रानाशाचा, तुमच्या श्वासांमधील अनियमिततेचा शोध घेण्यास मदत करणार आहे. तसेच युजर्सना वॉचमध्ये स्लीप अप्निया नोटिफिकेशनही मिळेल. त्याचबरोबर तुमची झोप किती चांगली झाली आहे, याचे विश्लेषण ॲपल वॉच १० एका नोटिफिकेशनमध्ये देईल. तुम्ही पाण्यात गेल्यावर तुमच्या आरोग्याचीही काळजी घेईल. या सगळ्या फीचर्सबरोबर ॲपल वॉच १० हे आजवरचे सर्वात पातळ (थिन) वॉच ठरणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 6/15

    त्याचबरोबर ॲपल ( Apple) वॉच अल्ट्रा २ ची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे ; जे प्रामुख्याने खेळाडूंसाठी डिझाइन करण्यात आले आहे. ॲपल वॉच अल्ट्रा 2 सॅटिन ब्लॅकमध्ये स्क्रॅच प्रतिरोधक केस, पॅराशूट लॉक-इन मेकॅनिझमसह ब्लॅक टायटॅनियम बँड्ससह उपलब्ध असणार आहे. ॲपल वॉच अल्ट्रा २ ची किंमत अमेरिकन डॉलर ७९९ ($799) पासून सुरू होते आणि २० सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्द असणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 7/15

    ॲपल एअरपॉडस् ४ (Apple AirPods 4)
    एअरपॉडस् ४ मध्ये चार्जिंग केस आता यूएसबी-सी ( USB-C) पोर्टसह असणार आहे. तसेच इतरांशी संवाद साधताना एअरपॉडस्चा आवाज कमी होईल आणि बोलणं संपल्यावर पुन्हा आवाज पहिल्यासारखा येईल. मशीन लर्निंगचा नवा अवतारसह एअरपॉडस् फोर ४ मध्ये आता वायरलेस चार्जिंग सुद्धा युजर्ससाठी उपलबद्ध करून देण्यात आलं आहे.तसेच सिरीला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही ‘होय’ किंवा ‘नाही’ म्हणून तुम्ही डोकं हलवू उत्तर देऊ शकता.याचबरोबर तुम्हाला ३० तासांची बॅटरी लाईफ सुद्धा मिळणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 8/15

    एअरपॉडस् प्रो मध्ये आता हिअरिंग प्रोटेक्शन देण्यात येणार आहे; ज्यामुळे कानाच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. एअरपॉडस् हिअरिंग एडचेही काम करणार आणि बहिरेपणा टाळण्यास मदत करणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 9/15

    आयफोन १६ चा कॅमेरा (iPhone 16 Camera ) :
    तसेच व्हिज्युअल इंटेलिजन्स आयफोन १६ चा कॅमेराच घेईल अनेक गोष्टींचा शोध घेईल. लेक्चर ऐकताना काही पॉइंटस् राहिले तर आय़फोन १६चा कॅमेरा राहून गेलेले पॉइंटस् जोडण्याचेही काम करेल. म्हणजेच आयफोन १६ कॅमेरा विचार करणारा, शोध घेणारा आणि तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे मदत देखील करणार आहे.आयफोन १६ मध्ये ४८ मेगापिक्सेल कॅमेरा, नवा १२ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा, आजूबाजूचे अनावश्यक आवाजही व्हिडीओतून गायब होण्याची तर iOS 18 मध्ये इमर्जन्सीमध्ये व्हिडीओ शेअर करण्याची क्षमता असणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 10/15

    तसेच व्हिज्युअल इंटेलिजन्स आयफोन १६ चा कॅमेराच घेईल अनेक गोष्टींचा शोध घेईल. लेक्चर ऐकताना काही पॉइंटस् राहिले तर आय़फोन १६चा कॅमेरा राहून गेलेले पॉइंटस् जोडण्याचेही काम करेल. म्हणजेच आयफोन १६ कॅमेरा विचार करणारा, शोध घेणारा आणि तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे मदत देखील करणार आहे.आयफोन १६ अल्ट्रामॅरिन, टील, पिंक, व्हाईट आणि ब्लॅक आदी रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 11/15

    आयफोन १६ (iPhone 16) :
    आयफोन १६ मध्ये कस्टमाइज ॲक्शन बटन, कॅमेरा कंट्रोल बटन असणार आहे. आयफोन १६ मध्ये ए १८ नवीन चीप असेल ; जी १५ पेक्षा ३० टक्के वेगात करणार करून ऊर्जेचा ३० टक्के बचत सुद्धा करेल. आयफोन १६ मध्ये ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले तर तर iPhone 16 Plus मध्ये त्याच फीचर्ससह ६.७ इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले मिळतो. दोन्ही आयफोन मध्ये ए १८ (A18) चिपसेट देण्यात आला आहे. तसेच यात iOS 18 सह Apple Intelligence (AI) सिस्टम देण्यात आली आहे. खास गोष्ट म्हणजे आता iPhone 16 मॉडेल्स AAA गेम्सला सपोर्ट करतील. आणि दोन्ही मॉडेल्स यूएसबी टाईप-सी ( Type-C) पोर्ट सह येतात. आयफोन १६ मध्ये मोठी बॅटरीसह वेगवान चार्जिंग होणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 12/15

    आयफोन१६ मध्ये प्रायव्हसी प्रॉमिस असेल ; ज्यामुळे तर थर्ड पार्टीही व्हेरिफिकेशन करू शकेल. अर्थात प्रायव्हसीची खातरजमा अगदी व्यवस्थित होईल. आयफोन १६ तुम्हाला हव्या असलेल्या फोटोच्या माध्यमातून तुमच्या आठवणींचा शोध घेण्यात मदत करेल. कारण – सिरीही एआयच्या मदतीने अधिक स्मार्ट झाला आहे. तुम्ही फक्त ॲपल इंटेलिजन्सच्या मदतीने सिरीला आदेश द्या, तो तुमचे काम तो काही सेकेंदात, अधिक सोप्पे करून देईल. तसेच खास गोष्ट अशी की, आयओएस १८ सह येणारा ॲपल इंटेलिजन्स जगातील अनेक भाषांमध्ये येणार आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 13/15

    ॲपल आयफोन १६ प्रो ( iPhone 16 Pro) :
    ॲपल ( Apple) आयफोन १६ प्रो काळा, पांढरा, सिल्व्हर, डेजर्ट कलर पर्यायांमध्ये येईल. आतापर्यंतची सर्वोत्तम आयफोन बॅटरी लाइफ या फोनमध्ये असणार आहे. हे A18 प्रो द्वारे समर्थित आहे जे द्वितीय-जनरल 3 नॅनो मीटर ट्रान्झिस्टरसह तयार केले आहे, ;जे जनरेटिव्ह एआय वर्कलोड्समध्ये उत्कृष्ट काम करण्यास मदत करते. ६ कोर जीपीयू ए १८ प्रो ला ए १७ प्रोपेक्षा १५ टक्के वेगवान बनवते तर ए १७ प्रो पेक्षा २० टक्केकमी उर्जा वापरते. (Photo : Apple Hub/X)

  • 14/15

    ॲपल आयफोन १६ प्रो मध्ये ४८ एमपी फ्यूजन कॅमेरा, ४८ एमपी अल्ट्रा वाइड कॅमेरा, १२ एमपी ५एक्स टेलीफोटो कॅमेरा सुद्धा असणार आहे. यात 4K120 फ्रेम्स प्रति सेकंदासह सिनेमॅटिक स्लो मोशन देखील आहे. iPhone 16 Pro मध्ये चार स्टुडिओ माइक देखील आहेत. यात अधिक इमर्सिव्ह अनुभवासाठी व्हिडीओ रेकॉर्डिंग दरम्यान ऑडिओ कॅप्चर करण्यास मदत होईल.तुम्ही लवकरच व्हॉइस मेमोमध्ये रेकॉर्डिंगच्या ठिकाणी दुसरा ट्रॅक ठेवू शकणार आहात ; युजर्सना दोन-ट्रॅक रेकॉर्डिंग करू देण्यासाठी हे फीचर लाँच करण्यात आले आहे. (Photo : Apple Hub/X)

  • 15/15

    भारतात ॲपल (Apple) आयफोन १६ ची किंमत ७९,९०० पासून सुरू होईल. आयफोन १६ प्लसची किंमत ८९,९०० रुपयांपासून, तर आयफोन १६ प्रोची किंमत १,१९,००० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तर आयफोन प्रो मॅक्स १,४४,९०० रुपयांपासून सुरू होऊ शकते. तसेच ॲपल वॉच सिरीज १० ची किंमत ४६,९०० रुपये ॲपल वॉच एसई २४,९०० रुपये ॲपल वॉच अल्ट्रा २ ची किंमत ८९, ९०० रुपयांपासून सुरु होईल तर एअरपॉड्स ४ ची किंमत १२,९०० रुपयांपासून सुरु होणार आहे ; असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (Photo : Apple Hub/X)

TOPICS
आयफोन
iPhone
टेक
Tech
टेक न्यूज
Tech News
टेक्नोलॉजी न्यूज
Technology News
ट्रेंडिंग न्यूज
Trending News
+ 1 More

Web Title: Apple event 2024 photos apple iphone 16 series apple watch series 10 airpods 4 launch ndj

IndianExpress
  • DGCA gives ‘last and final’ extension to IndiGo for damp-leased Turkish Airlines aircraft; IndiGo to terminate arrangement within three months
  • In Telangana, row over CM Revanth Reddy’s question – ‘how many Rafales were shot down, PM?’
  • Trump says China ‘totally violated’ tariff truce after US warns trade talks have ‘stalled’
  • IPL 2025 Eliminator, GT vs MI LIVE Cricket Score: Mohammed Siraj picks Tilak Varma, Mumbai Indians 196/4 vs Gujarat Titans in Mullanpur
  • Sister Midnight movie review: Radhika Apte film is a bizarro-serio-comedy like no other
Follow Us
  • Facebook
  • Twitter
Download Apps
  • Play_stor
  • Apple_stor
Express Group
  • The Indian Express
  • The Financial Express
  • Jansatta
  • IeTamil.Com
  • IeMalayalam.Com
  • IeBangla.Com
  • ieGujarati.com
  • inUth
  • IE Education
  • The ExpressGroup
  • Ramnath Goenka Awards
Quick Links
  • Privacy Policy
  • Terms and Conditions
  • Indian Express Group
  • Advertise With Us
  • Contact us
  • This Website Follows The DNPA’s Code Of Conduct
  • About Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.

  • होम
  • ई-पेपर
  • फोटो
  • व्हिडिओ
  • करिअर
  • हेल्थ
  • अर्थभान
    • बाजार
    • अर्थवृत्त
    • मनी-मंत्र
  • रेसिपी
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
    • संपादकीय
    • स्तंभ
    • विशेष लेख
  • महाराष्ट्र
  • शहर
    • मुंबई
    • पुणे
    • ठाणे
    • पिंपरी चिंचवड
    • नवी मुंबई
    • वसई विरार
    • पालघर
    • नाशिक / उत्तर महाराष्ट्र
    • नागपूर / विदर्भ
    • छत्रपती संभाजीनगर
    • कोल्हापूर
    • अमरावती
    • अकोला
    • बुलढाणा
    • वाशिम
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • देश-विदेश
  • राशिभविष्य
    • साप्ताहिक राशिभविष्य
    • राशी वृत्त
    • राशिभविष्य
  • मनोरंजन
    • ओटीटी
    • टेलीव्हिजन
    • बॉलीवूड
    • मराठी सिनेमा
  • क्विझ
  • चतुरा
  • लाइफस्टाइल
  • ऑटो
  • विश्लेषण
  • तंत्रज्ञान
  • FYI
  • वेब स्टोरीज
  • ऑडिओ
  • करिअर
    • चतुरंग
    • लोकरंग
    • बालमैफल
    • व्हिवा
    • वास्तुरंग
    • विशेष
  • अन्य
    • नवनीत
  • ब्लॉग्स
  • आमच्या विषयी
  • Contact Us
  • TERMS AND CONDITIONS
  • RSS
  • Privacy Policy
  • About Us