-
स्केल एआयचा सीईओ अलेक्झांडर वांग हा आर्टिफिशियल इंटेलिजेंस क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झाला आहे. चिनी स्थलांतरित पालकांच्या पोटी जन्मलेल्या वांग कॉलेज ड्रॉपआउट आहे.
-
अलेक्झांडर वांगचा जन्म अमेरिकेतील न्यू मेक्सिको येथे झाला आहे. त्याचे पालक लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीमध्ये अणुभौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करतात.
-
अलेक्झांडर वांगने उभारलेल्या स्टार्टअपचे मूल्य 29 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. शिवाय, मेटाने त्याच्या कंपनीचा १५ अब्ज डॉलर्समध्ये ४९% हिस्सा विकत घेतला आहे. याबाबत रॉयटर्सने वृत्त दिले आहे.
-
या कराराचा एक भाग म्हणून, अलेक्झांडर वांग आता मेटा येथे ५० जणांच्या संशोधन प्रयोगशाळेचे नेतृत्व करतात जी मानवी क्षमतांना मागे टाकण्यासाठी डिझाइन केलेली एआय प्रणाली तयार करण्यासाठी समर्पित आहे.
-
कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी त्याच्याकडे क्वोरामध्ये काम करण्याचा अनुभव होता. नंतर, वांगने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये प्रवेश घेतला परंतु फक्त एका वर्षातच त्याने कॉलेज सोडले आणि स्टार्टअप अॅक्सिलरेटर Y कॉम्बिनेटरमध्ये सहभागी झाला.
-
२०१६ मध्ये वाय कॉम्बिनेटरमधील त्यांच्या कार्यकाळादरम्यान वांगने लुसी गुओच्या सहकार्याने स्केल एआयची स्थापना केली. यानंतर वांग आणि गुओ दोघांनीही दोन वर्षांत फोर्ब्सच्या एंटरप्राइझ तंत्रज्ञानाच्या “३० अंडर ३०” यादीत स्थान मिळवले होते.
-
पीटर थिएलच्या फाउंडर्स फंडमधून १०० दशलक्ष डॉलर्सचा निधी मिळवल्यानंतर, कंपनीने २०१९ मध्ये युनिकॉर्नचा दर्जा मिळवला.
-
काही वर्षांनंतर, आणखी एका मोठ्या निधी संकलन फेरीतून त्यांना ५८० दशलक्ष डॉलर्सचा निधा मिळाला, ज्यामुळे कंपनीचे मूल्य ७ अब्ज डॉलर्स झाले. यामुळे २४ व्या वर्षी, वांग जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश बनला.
-
वीस वर्षांचा वांग केवळ आजच्या एआयसाठी साधने तयार करत नाहीये तर उद्याच्या जगासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा काय अर्थ असेल हे परिभाषित करण्यास मदत करत आहे. (सर्व फोटो सौजन्य: @alexandr_wang/X)
कोण आहे अलेक्झांडर वांग? कॉलेज अर्धवट सोडून उभारली अब्जावधींची कंपनी!
Alexandr Wang: अलेक्झांडर वांगचा जन्म अमेरिकेतील न्यू मेक्सिको येथे झाला आहे. त्याचे पालक लॉस अलामोस नॅशनल लॅबोरेटरीमध्ये अणुभौतिकशास्त्रज्ञ म्हणून काम करतात.
Web Title: Alexandr wang mit dropout ai billionaire start up success stories aam