-
नुकतीच अॅपलने आयफोन १७ सीरीज लॉन्च केली. अलीकडेच भारतात त्याची विक्रीही सुरू झाली. मुंबई, बंगळूरु सारख्या शहरांमध्ये आयफोन १७ खरेदी करण्यासाठी स्टोअर्समध्ये प्रचंड गर्दीही उसळली. काही अतिउत्साही ग्राहकांमध्ये हाणामारीही झाली.
-
दरम्यान, आयफोन १७ सिरीजमधील सर्वच मॉडेल्सच्या किमती वाढीव आहेत. पण त्यातही त्या भारतीयांसाठी अधिक महाग ठरत आहेत. अख्ख्या जगात स्टँडर्ड आयफोन १७ ते आयफोन १७ प्रो मॅक्ससाठी भारतीयच सर्वात जास्त पैसे मोजत आहेत. चला आयफोन १७ कोणत्या देशात किती किंमतीला उपलब्ध आहे? ते जाणून घेऊयात…
-
भारत
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- १३४,९०० रुपये -
यूके
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- १२१,८०० रुपये -
फ्रान्स
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- १२०,००० रुपये -
जर्मनी
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ११०,८०० रुपये -
कॅनडा
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ९३,९०० रुपये -
यूएई
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ९८,२०० रुपये -
आस्ट्रेलिया
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ९७,३०० रुपये -
यूएसए
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ९६,९०० रुपये -
सिंगापूर
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ९१,२०० रुपये -
जपान
मॉडेल आयफोन १७ प्रो २५६ जीबी
किंमत- ८५,६०० रुपये -
दरम्यान, स्टँडर्ड आयफोन १७ आणि आयफोन १७ प्रो मॅक्स तसेच आयफोन एअरच्या किंमतीही भारतासाठी अधिक आहेत. (सर्व फोटो आयफोन सोशल मीडिया) हेही पाहा- जगायचं असेल तर लढावं लागेल! साप आणि मुंगूस यांच्यातल्या वैराचं कारण माहितीये का? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य…
आयफोन १७ भारतीयांनाच महाग! यूके, यूएसए ते जपान; जगातल्या १० देशांमध्ये त्याची किंमत किती? वाचा…
iPhone 17 price India, World Comparison : अख्ख्या जगात स्टँडर्ड आयफोन १७ ते आयफोन १७ प्रो मॅक्ससाठी भारतीयच सर्वात जास्त पैसे मोजत आहेत.
Web Title: Indians pays the most for iphone 17 pro 256gb global price breakdown in marathi spl