• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bjp udyanraje bhosale shivsena udddhav thackeray sharad pawar chhatrapati shivaji maharaj pm narendra modi sgy

उदयनराजेंच्या तुफान फटकेबाजीने गाजली पत्रकार परिषद, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

उदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

January 14, 2020 17:35 IST
Follow Us
    • भाजपा नेते आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराजांशी तुलना करण्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मात्र यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर टीका करत तुफान फटकेबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फक्त राजकारणासाठी वापर केला जात असल्याचा आरोप शिवसेनेवर करत शरद पवार यांना जाणता राजा उपाधी देण्यावरुनही उदयनराजेंनी जोरदार टीका केली. ५० मिनिटांच्या पत्रकार परिषदेत उदयनराजे यांनी तुफान फटकेबाजी केली. या पत्रकार परिषदेत उदयनराजे नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
    • मी कधीही राजकारण केलेलं नाही. ज्या शिवाजी महाराजांकडे फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आदर्श म्हणून पाहतं त्यांची अनेकदा तुलना होताना पाहून दु:ख वाटतं (फोटो सौजन्य – फेसबुक)
    • लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का काय ? असं वाटतं. पुस्तक पाहून फक्त मलाच नाही तर महाराजांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला वाईट वाटलं. या जगात महाराजांशी तुलना होईल इतकी कोणाचीच उंची नाही
    • 1/33

      एक युगपुरुष कधीतरी जन्माला येतो ते म्हणजे शिवाजी महाराज, जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. इतर कुणालाही जाणता राजा उपाधी देणं याचाही मी निषेध करतो (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 2/33

      इतर कुणालाही जाणता राजा उपाधी देणं याचाही मी निषेध करतो (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 3/33

      एखाद्याला जाणता राजा म्हणणं शिवाजी महाराजांना कमी लेखण्यासारखं आहे. जाणत्या राजाने तर उत्तर दिलंच पाहिजे (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 4/33

      राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 5/33

      संपूर्ण जगात फक्त शिवाजी महाराज एकमेव आहेत ज्यांना देवाचं स्थान आहे, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही. (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 6/33

      आपण जेव्हा कधी त्यांचं चरित्र वाचतो तेव्हा कुठेतरी त्यांच्याप्रमाणे व्हावं असं वाटतं. शिवाजी महाराज कोणीही होऊ शकत नाही (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 7/33

      आजपर्यंत प्रत्येक वेळेस गळ्यात पट्टा न बांधलेले लुडबूड करत असतात. काही झालं तरी उगाच आरोप सुरु होतात. या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान आहे. (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 8/33

      गेल्या जन्मात सर्वांपेक्षा मुंगीएवढं जास्त पुण्य केलं म्हणून या घराण्यात माझा जन्म झाला. आपण कधीही महाराजांचे वंशज म्हणून कधीही दुरुपयोग केला नाही. कधीही मिरवलो नाही. (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 9/33

      लोकशाही आम्ही मान्य केली. तुम्ही आम्ही समान आहोत ही संकल्पना चुकीची नाही. शिवाजी महाराजांनी त्यावेळी जे सर्वधर्मभाव याबद्दल सांगितलं होतं ती संकल्पना कुठे गेली. सोयीप्रमाणे प्रत्येकाने वापर करायचा हे कशासाठी ? (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 10/33

      प्रत्येक वेळेस वंशजांना विचारा असं सागंण्यात येतं. शिवसेना नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारण्यास तुम्ही आला होता का? महाशिवआघाडीतून शिव काढलं ? सोयीप्रमाणे वापर करायचा आणि सोयीप्रमाणे महाराजांचा विसर पडणे हीच यांची लायकी. वडापावला शिवाजी महाराजांचं नाव कसं देता ? महाराजांना काही आदर आहे की नाही ? (फोटो – आशिष काळे)

    • 11/33

      शिवसेना भवनावर महाराजांचा फोटो बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोच्या वरती हवा होता (फोटो – आशिष काळे)

    • 12/33

      वंशज म्हणून तुम्ही आमच्यावर सारखी टीका करता, पण आम्ही काय केलं ते सांगा ? महाराजांनी जी शिकवण दिली तसंच वागत आहोत. सत्तेच्या मागे कुत्र्यासारखं धावलो नाही. (फोटो – आशिष काळे)

    • 13/33

      खासदारकीसाठी गेले असं कोणी म्हटलं होतं, पण जाऊ द्या….निवडून आल्यानंतर मीच राजीनामा देऊन टाकला . जे माझ्या बुद्धीला पटत नाही, ते मी करत नाही…कोणाच्या मागे पुढे पळणाऱ्यांपैकी मी नाही (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 14/33

      माझं नातं सर्वसामान्यांशी आहे, त्यांच्यासाठी जीव देण्याची तयारी आहे (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 15/33

      माझ्याविरोधात ब्र शब्द काढला तर ध्यानात ठेवा मी बांगड्या घातलेल्या नाहीत आणि घालणार नाही. कोणी काहीही बोलायचं आणि मी ऐकून घ्यायचं असं कोणी सांगितलं (फोटो – आशिष काळे)

    • जेम्स लेनने अपमान केला तेव्हा शिवसेनेची अस्मिता कुठे गेली होती ? सोयीप्रमाणे शिवाजी महाराजांचं नाव का घेता ? काय लायकी आहे तुमची ? मला हा प्रश्न सगळ्या पक्षांना विचारायचा आहे. जर अनुकरण केलं असतं, विचार आचरणात आणले असते तर आज ही परिस्थिती निर्माण झाली असती
    • 16/33

      शेतकरी मरत असताना फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पळवापळवी चालू होती. राज्याचा खेळखंडोबा केला आहे. हे दिवस पाहण्यापेक्षा मेलेलं बरं असं वाटतंय. (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 17/33

      इतकंच असेल तर शिव हे नाव काढून टाकावं. वंशज म्हणून आम्ही काय ते पाहून घेऊ. शिवसेनेने नाव बदलून ठाकरेसेना करावं. नाव बदलाल तेव्हा राज्यातील किती लोक तुमच्यासोबत राहतात हे मला पहायचं आहे. नाव वापरता तेव्हा थोडी तरी लाज राखा (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 18/33

      शिवजयंती तीन वेळा का केली जाते ? १९ फेब्रुवारी तारीख ठरली असतानाही त्यांची मानहानी कशासाठी करता ? परदेशात राहणारे अनेकजण शिवजयंतीचा एकच दिवस ठरवा अशी विनंती करतात. जेव्हा लोक तीन जयंती कशी काय विचारतात तेव्हा काय उत्तर द्यायचं कळत नाही (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 19/33

      स्वार्थासाठी एकत्र येणारे जास्त काळ एकत्र राहत नाही. स्वार्थ साध्य झाला की ते आपापल्या मार्गाने निघून जातात. महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा. जेव्हा लोक विचाराने एकत्र येतात तेव्हा त्यांना तोडणं कठीण असतं.(फोटो – आशिष काळे)

    • 20/33

      राजेशाही असती तर एकालाही उपाशी ठेवलं नसतं ? ही महाराजांची शिकवण लोकशाही अंमलात आणल्यानंतर त्या लोकशाहीतील राजांनी तसं वागलं पाहिजे की नाही ? (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 21/33

      जर यापुढे महाराजांचं नाव काढलं तर त्याप्रमाणे वागा नाहीतर नाव घेऊ नका (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 22/33

      गलिच्छ राजकाऱणाचं खापर आमच्यावर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना परिणामांना सामोरं जावं लागेल (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 23/33

      वडापावला शिवाजी महाराजांचं नाव कसं देता ? महाराजांना काही आदर आहे की नाही ?

    • उद्धव ठाकरेंनी शिवाजी महाराजांचे नाही पण किमान आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचं तरी आचरण करावं
    • 24/33

      आपण प्रत्येकजण शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. योगायोगाने आपण या कुटुंबात जन्माला आलो म्हणून वंशज आहोत. (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 25/33

      आधी चार जाती होत्या, आता चार हजार झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या जनतेने आपण सरकारच्या हातातील बाहुली झाली आहोत का याचा एकदा विचार करा (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 26/33

      स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी जे विचार मांडले त्यांचा विचार केला पाहिजे. प्रत्येक राजकीय पक्षाने एक जात पकडली आहे, खूप मोठी दरी निर्माण करण्यात आली आहे (फोटो – आशिष काळे)

    • 27/33

      राजेशाहीने वाटचाल केली तर कोणी गोयल वैगेरे उरणार नाही (फोटो सौजन्य – फेसबुक)

    • 28/33

      राजेशाहीने वाटचाल केली तर कोणी गोयल वैगेरे उरणार नाही (फोटो सौजन्य – फेसबुक)

Web Title: Bjp udyanraje bhosale shivsena udddhav thackeray sharad pawar chhatrapati shivaji maharaj pm narendra modi sgy

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.