• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • मराठवाडा
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. mahindra funster electric sportscar unveiled in auto expo 2020 sas

Mahindra चा जलवा! सिंगल चार्जमध्ये तब्बल 520 Km धावणार , 5 सेकंदात 100 चा स्पीड

दिसताच ‘याड’ लागावं अशी महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार, पाहा फोटो

February 10, 2020 16:46 IST
Follow Us
  • Mahindra and Mahindra कंपनीने पाच फेब्रुवारीपासून ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये एकाहून एक शानदार गाड्या सादर केल्या आहेत. ((सर्व छायाचित्र सौजन्य - ट्विटर आणि @AEMotorShow))
    1/21

    Mahindra and Mahindra कंपनीने पाच फेब्रुवारीपासून ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपो 2020 मध्ये एकाहून एक शानदार गाड्या सादर केल्या आहेत. ((सर्व छायाचित्र सौजन्य – ट्विटर आणि @AEMotorShow))

  • 2/21

    कंपनीने देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार e-KUV100 च्या लाँचिंगसोबतच इलेक्ट्रिक एसयुव्ही e-XUV300 आणि अनेक कॉन्सेप्ट कार सादर केल्या. पण, या सर्व गाड्यांमध्ये सर्वांचं सर्वाधिक लक्ष वेधणारी कार ठरली ती म्हणजे Mahindra Funster.

  • वरच्या बाजूला उघडणाऱ्या दरवाजांमुळे( Butterfly Door) ही कार इतरांपेक्षा बरीच वेगळी आणि अत्यंत आकर्षक ठरते.
  • 3/21

    ही एक कन्व्हर्टेबल रोड्स्टर इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार आहे. या कारला तुम्ही इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कारही बोलू शकतात.

  • 4/21

    वेगाच्या बाबतीत ही कार अफलातून आहे.

  • या कारचा टॉप स्पीड 200 किलोमीटर प्रतितास इतका आहे.
  • 5/21

    Mahindra Funster ही वेगवान कार अवघ्या पाच सेकंदांमध्ये 0 ते 100 किलोमीटर प्रतितास इतका वेग पकडते.

  • 6/21

    लांब पल्ल्याचं अंतर कापण्याची क्षमताही Mahindra Funster या कारमध्ये आहे.

  • 7/21

    एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 520 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापू शकते, असा दावा कंपनीने केला आहे.

  • 8/21

    कारमध्ये चार जण बसण्याची क्षमता आहे.

  • 9/21

    कारच्या इंटेरिअरमध्ये मोठी इन्फोटेन्मेंट स्क्रीन आणि डिजिटल इंस्ट्रुमेंट कल्स्टर असून स्टिअरिंगही स्पोर्ट्स कारप्रमाणेच आहे. 

  • 10/21

    महिंद्राच्या या कारमध्ये Range Rover च्या Evoque ची झलक पाहायला मिळते. इवोकमध्ये केवळ Butterfly Door दिलेले नाहीत.

  • 11/21

    Mahindra Funster या कारमध्ये ड्युअल इलेक्ट्रिक मोटर आणि AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) सिस्टिम आहे.

  • 12/21

    पावरच्या बाबतीतही Funster ही कार दमदार असून 313 हॉर्स पावरची ऊर्जा निर्माण करते.

  • 13/21

    कारचं फ्रंट लुक शार्प आहे, तर फ्लोटिंग टेल लँप्स, स्पोर्ट्स शू इंस्पायर्ड व्हील आर्क्स आणि स्पोर्टी इंटेरिअर आहे.

  • 14/21

    Mahindra Funster च्या साइड प्रोफाइलवर बोल्ड कॅरेक्टर लाइन्स आहे. ती कारच्या मागच्या भागापर्यंत जाते. यावर एक लाइटबार दिला आहे.

  • 15/21

    महिंद्राच्या फन्सेटर इलेक्ट्रिक कंसेप्ट कारला Mahindra Funster Electric Concept कारला ऑटो एक्स्पोमध्ये पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती.

  • Funster ही कार महिंद्राच्या MESMA प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे.
  • 16/21

    पाच फेब्रुवारीपासून ग्रेटर नोएडामध्ये सुरू असलेल्या ऑटो एक्सपोची १२ तारखेला सांगता होणार आहे.

  • 17/21

    आतापर्यंत ऑटो एक्सपो 2020 मध्ये अनेक कंपन्यांनी आपल्या Concept कार सादर केल्या, पण सर्वाधिक चर्चा राहिली ती म्हणजे महिंद्राच्या Funster चीच.

  • 18/21

    (सर्व छायाचित्र सौजन्य – ट्विटर आणि @AEMotorShow)

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsकारCarमहिंद्राMahindra

Web Title: Mahindra funster electric sportscar unveiled in auto expo 2020 sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.