Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. tata motors discount up to rs 2 lakh on cars like hexa harrier tiago nexon sas

स्टॉक संपवण्यासाठी TATA च्या गाड्यांवर ‘बंपर’ डिस्काउंट

BS-6 इंजिनचा नियम लागू होण्याआधी कंपनीकडून भरघोस सवलत

February 14, 2020 17:02 IST
Follow Us
  • जर तुम्ही Tata ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण, एक एप्रिल 2020 पासून भारतात प्रदूषण नियंत्रणासाठी भारत स्टेज-4 म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद होणार आहे. त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्या आपल्याकडील शिल्लक BS4स्टॉक संपवण्यासाठी विविध ऑफर देत आहे. याअंतर्गत देशातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी Tata Motors आपल्या BS-4 प्रकारच्या काही गाड्यांवर तब्बल दोन लाखापर्यंत डिस्काउंट देत आहे. यामध्ये Tiago पासून Hexa, Harrier यांसारख्या शानदार गाड्यांचा समावेश आहे. तर, आपण जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट ऑफर आहे...
    1/10

    जर तुम्ही Tata ची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. कारण, एक एप्रिल 2020 पासून भारतात प्रदूषण नियंत्रणासाठी भारत स्टेज-4 म्हणजेच BS-4 या वाहनांची विक्री बंद होणार आहे. त्यामुळे सर्व मोठ्या कंपन्या आपल्याकडील शिल्लक BS4स्टॉक संपवण्यासाठी विविध ऑफर देत आहे. याअंतर्गत देशातील आघाडीची ऑटोमोबाइल कंपनी Tata Motors आपल्या BS-4 प्रकारच्या काही गाड्यांवर तब्बल दोन लाखापर्यंत डिस्काउंट देत आहे. यामध्ये Tiago पासून Hexa, Harrier यांसारख्या शानदार गाड्यांचा समावेश आहे. तर, आपण जाणून घेऊया कोणत्या कारवर किती डिस्काउंट ऑफर आहे…

  • Tata Zest BS6 मानक लागू झाल्यानंतर टाटा कंपनीकडून Tata Zest या गाडीचं उत्पादन पूर्णतः थांबवलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे compact sedan प्रकारातील या कारवर कंपनीच्या डिलरशीपमध्ये Zestवर तब्बल 90 हजार रुपयांची विविध प्रकारे सवलत दिली जात आहे.
  • Tata Bolt इंडिका व्हिस्टा या कारला रिप्लेस करणाऱ्या Tata Bolt या कारवर देशभरातील डिलरशीपमध्ये 80,000 रुपयांची सवलत दिली जात आहे. Zest प्रमाणे BS6 मानक लागू झाल्यानंतर Bolt चं उत्पादनही थांबवलं जाण्याची दाट शक्यता आहे.
  • Tata Tigor टाटाने गेल्या महिन्यातच Tigor कारसाठी BS6 फेसलिफ्ट व्हर्जन लाँच केले. पण, अद्यापही कंपनीच्या डिलरशिप्समध्ये BS4 चा स्टॉक शिल्लक आहे. टाटाने छोट्या डिझेल इंजिन गाड्यांचं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे BS4 Tigor च्या डिझेल व्हेरिअंटवर 70,000 रुपयांपर्यंत फायदा मिळेल. तर, पेट्रोल ट्रिम्सवर 60,000 रुपयांपर्यंत सवलत दिली जात आहे.
  • Tata Nexon Tigor च्या फेसलिफ्ट व्हर्जन लाँचिंगवेळीच Nexon कारसाठी मिड-लाइफ फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्यात आले होते. स्टॉक संपवण्यासाठी कंपनीकडून Nexon च्या प्री-फेसलिफ्ट BS4 मॉडेलवर 55 हजार रुपयांपर्यंतच सवलत दिली जात आहे.
  • Tata Safari Storme टाटा मोटर्सने गेल्या वर्षी आपली आयकॉनिक SUV Safari Storme (सफारी स्टॉर्म) चं प्रोडक्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. कंपनीच्या या निर्णयाबाबत अनेकांना आश्चर्य वाटलं. पण अद्यापही काही डिलरशिपमध्ये ही कार शिल्लक आहे. त्यामुळे कंपनीकडून या एसयुव्हीच्या खरेदीवर 55,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे.
  • Tata Tiago BS4 Tiago मध्ये सेडान कार Tigor प्रमाणेच 1.2-लीटर, 3-सिलिंडर पेट्रोल आणि 1.05-लीटर, 3-सिलिंडर डिझेल इंजिन मिळते. टियागो काही दिवसांपूर्वीच BS6 इंजिनमध्ये अपडेट करण्यात आले आहे. परिणामी, टियागोच्या BS4डिझेल व्हेरिअंटवर 50,000 रुपयांपर्यंतचा फायदा डिलरशिपमध्ये मिळेल. तर, पेट्रोल ट्रिम्सवर 45 हजार रुपयांपर्यंतची सवलत आहे.
  • Tata Harrier टाटा मोटर्सने ऑटो एक्स्पो 2020 मध्ये BS6 इंजिनच्या Harrier ला काही कॉस्मेटिक बदल, अधिक शक्तिशाली इंजिन आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनच्या पर्यायासह सादर केले. त्यामुळे BS4 स्टॉक संपवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. परिणामी देशभरातील कंपनीच्या डिलरशिप्समध्ये हॅरियर BS4च्या खरेदीवर तब्बल 1.3 लाख रुपये डिस्काउंट मिळेल.
  • Tata Hexa येत्या काही दिवसांमध्ये टाटाच्या 7 सीटर Tata Hexa या गाडीला BS6 इंजिनमध्ये अपडेट केले जाणार असून काही महिन्यांनंतर लाँच केले जाईल. त्यामुळे, सध्या कंपनीकडून BS4 Hexa वर तब्बल दीड लाख रुपये डिस्काउंट आणि यासोबतच 50 हजार रुपयांपर्यंत एक्स्चेंज बेनिफिट ऑफर दिली जात आहे.
  • 2/10

    टाटा मोटर्सकडून सर्वाधिक म्हणजे तब्बल दोन लाखापर्यंतचे डिस्काउंट Tata Hexa या कारवर दिले जात आहे.

TOPICS
ऑटो न्यूजAuto NewsऑटोमोबाइलAutomobileटाटा मोटर्सTata Motorsटाटा समूहTATA Group

Web Title: Tata motors discount up to rs 2 lakh on cars like hexa harrier tiago nexon sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.