• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bs6 maruti suzuki vitara brezza facelift 2020 booking started know expected price and all detailsauto expo 2020 sas

Maruti चा धमाका, फक्त 11 हजारांत बुक करा नवीन Brezza

XUV300, Hyundai venue या गाड्यांना तगडी टक्कर, किंमत फक्त…

February 14, 2020 19:58 IST
Follow Us
  • ‘ऑटो एक्स्पो 2020’ची (Auto Expo 2020) ग्रेटर नोएडामध्ये सांगता झाली. यामध्ये अनेक कंपन्यांनी एकाहून एक आकर्षक गाड्या सादर केल्या. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी Maruti Suzuki नेही आपली लोकप्रिय Vitara Brezza या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर केले.
    1/16

    ‘ऑटो एक्स्पो 2020’ची (Auto Expo 2020) ग्रेटर नोएडामध्ये सांगता झाली. यामध्ये अनेक कंपन्यांनी एकाहून एक आकर्षक गाड्या सादर केल्या. देशातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी Maruti Suzuki नेही आपली लोकप्रिय Vitara Brezza या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन सादर केले.

  • 2/16

    नवीन Maruti Brezza पेट्रोल इंजिनमध्ये येईल. तर, 18 फेब्रुवारीला कंपनी ही कार लाँच करणार आहे. पण, लांचिंगआधीच कंपनीने या गाडीसाठी बुकिंग घेण्यास सुरूवात केलीये. अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये देशभरातील कोणत्याही मारुतीच्या डिलरशिपमध्ये ही कार बुक करता येईल.

  • 3/16

    Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे यातील इंजिन. नवी Brezza बीएस-6 कम्प्लायंट 1.5-लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असेल, आतापर्यंत ही कार 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्येही यायची.

  • 4/16

    फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझेल इंजिन मिळणार नाही. कारण, भारतात एप्रिल 2020 पासून बीएस-6 मानक लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याची घोषणा यापूर्वीच मारुतीने केली होती.

  • 5/16

    Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये असलेले इंजिन आणि मारुतीच्या सियाजमधील इंजिन सारखेच आहे. हे 1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन 103 bhp ची ऊर्जा आणि 138 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्यायही मिळेल.

  • 6/16

    ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटमध्ये मारुतीच्या स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीचाही वापर केला जाणार आहे. मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत या कारचा मायलेज 17.03 किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिडसोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचा मायलेज 18.76 किलोमीटर प्रतिलीटर आहे.

  • 7/16

    नवीन लुक : Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला नवीन ट्विन-स्लेट ग्रिल, नव्या डिझाइनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, L-शेप डीआरएल, 16-इंच ड्युअल टोन अॅलॉय व्हिल्स, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि बुल-बार स्टाइल स्किड प्लेट मिळतील.

  • 8/16

    अपडेटेड फीचर : नव्या Brezza च्या कॅबिनमध्ये नवीन 7-इंच स्मार्टप्ले स्टूडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम आता लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हॉइस रिकग्निशन, व्हेइकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाइन कॉन्टेंटसोबत येते. याशिवाय इन्फोटेन्मेंट सिस्टिम पहिल्याप्रमाणे अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कार-प्ले सपोर्ट करेल.

  • 9/16

    किती असेल किंमत : Brezza फेसलिफ्ट व्हर्जनची किंमत 7 लाख रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या डिझेल इंजिन Brezza ची किंमत 7.63 लाख रुपये होती.

  • 10/16

    मार्केटमध्ये नव्या Brezza ची स्पर्धा टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूवी300 आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांसारख्या एसयुव्हींसोबत असेल.

  • 11/16

    नव्या Brezza च्या मागील बाजूला एलईडी टेललॅम्प दिले आहेत, पण डिझाइनमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही.

  • 12/16

    मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत या कारचा मायलेज 17.03 किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिडसोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचा मायलेज 18.76 किलोमीटर प्रतिलीटर आहे.

  • इंजिन – अपडेटेड इग्निसमध्ये BS6 कम्प्लायंट, 1.2-लीटर K12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 82 bhp ची ऊर्जा आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे.
  • यामध्ये BS6 कम्प्लायंट 1.2-लीटर K12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 82 bhp ची पावर आणि 113 Nm टॉर्क जनरेट करते. तर 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गियरबॉक्सचे ऑप्शन उपलब्ध आहे.
  • या कारमध्ये 17.78 सेंटीमीटरचा स्मार्टप्ले स्टूडियो, क्लाउडशी जोडले जाण्यास सक्षम इंफोटेनमेंट सिस्‍टम, ट्रॅफिकची ताजी माहिती, आवाज ओळखण्याची सिस्टीम, चालकाला सुरक्षाच्या दृष्टीने सतर्क करण्याचे इतर फिचर्सही देण्यात आले आहे.
  • 13/16

    (Maruti Ignis Facelift )

TOPICS
मारुती सुझुकीMaruti Suzuki

Web Title: Bs6 maruti suzuki vitara brezza facelift 2020 booking started know expected price and all detailsauto expo 2020 sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.