Maruti Suzuki ने आपली पॉप्युलर कॉम्पॅक्ट अर्बन एसयुव्ही कार Maruti Suzuki Ignis फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच केली आहे. कंपनीने ऑटो एक्सपो 2020 मध्ये या कारची झलक दाखवली होती. आता अधिकृतपणे ही कार भारतात लाँच झाली आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य, ट्विटर, @SirishChandran आणि @Kranti_Sambhav) कारमध्ये नवीन काय? : इग्निसच्या लुकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कारला फ्रेश लुक देण्यासाठी कंपनीने कारच्या फ्रंटमध्ये नवीन क्रोम ग्रिल दिले आहेत, त्यामुळे कारला स्पोर्टी लुक आलंय. कारमध्ये फॉक्स स्कफ प्लेट्ससोबत नवीन फ्रंट आणि रिअर बंपर आहेत. याशिवाय वेगळे फॉग लॅम्प केसिंग आणि व्हर्टिकल रिफ्लेक्टरचा समावेश आहे. -
पुढे बोलताना शशांक श्रीवास्तव यांनी मारुतीच्या नवीन Ignis फेसलिफ्ट व्हर्जनबाबतही माहिती दिली. नव्या इग्निसलाही ग्राहकांचा शानदार प्रतिसाद असून बुकिंग सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये दीड हजारांहून अधिक जणांनी बुकिंग केल्याचं त्यांनी सांगितलं.
-
कारमध्ये फॉक्स स्कफ प्लेट्ससोबत नवीन फ्रंट आणि रिअर बंपर आहेत. याशिवाय वेगळे फॉग लॅम्प केसिंग आणि व्हर्टिकल रिफ्लेक्टरचा समावेश आहे.
इंटेरियरमध्ये काय बदल ? : नव्या इग्निसमध्ये 7-इंच टचस्क्रीनसोबत मारुतीचा नवीन स्मार्टप्ले स्टुडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. याला अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट आहे. याशिवाय इग्निसमध्ये पहिल्यांदा सुझुकी एस-कनेक्ट कनेक्टिव्हिटी फीचर आहे. हे पर्यायी फीचर आहे. -
नव्या इग्निसच्या किंमतीतही बदल झाला असून आता या कारची बेसिक किंमत 4.83 लाख रुपये झाली आहे. तर, इग्निसच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.13 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत. पुढे वाचा सर्व व्हेरिअंट्सची किंमत –
-
आता ही कार ल्यूसेंट ऑरेंज आणि फिरोजा ब्लू या दोन नव्या कलर्सच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. मारुती इग्निस फेसलिफ्ट ही कार तसं पाहायला गेलं तर जुन्या मॉडेलप्रमाणेच आहे .पण, स्पोर्टी लुकमुळे गाडीला शानदार लुक आलं आहे .
-
किंमत किती (एक्स-शोरुम) : इग्निस सिग्मा पेट्रोल BS4 – जुनी किंमत ₹4,74,373 रुपये, नवीन किंमत ₹4,83,320 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस डेल्टा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹5,35,645 रुपये, नवीन किंमत ₹5,60,841 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस जीटा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹ 5,77,768 रुपये, नवीन किंमत ₹5,83,320रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस अल्फा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹6,62,994 रुपये, नवीन किंमत ₹6,66,898 रुपये(एक्स-शोरुम किंमत), इग्निस डेल्टा पेट्रोल AMT जुनी किंमत₹5,82,645 रुपये, नवीन किंमत ₹6,07,841 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस जीटा पेट्रोल AMT जुनी किंमत₹6,24,768 रुपये, नवीन किंमत ₹6,30,320 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस अल्फा पेट्रोल AMT जुनी किंमत₹7,09,994 रुपये, नवीन किंमत ₹7,13,898 रुपये(एक्स-शोरुम किंमत)
किंमत किती – इग्निस सिग्मा पेट्रोल BS4 – जुनी किंमत ₹4,74,373 रुपये, नवीन किंमत ₹4,83,320 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस डेल्टा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹5,35,645 रुपये, नवीन किंमत ₹5,60,841 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस जीटा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹ 5,77,768 रुपये, नवीन किंमत ₹5,83,320रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस अल्फा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹6,62,994 रुपये, नवीन किंमत ₹6,66,898 रुपये(एक्स-शोरुम किंमत) याशिवाय… किंमत किती – इग्निस डेल्टा पेट्रोल AMT जुनी किंमत₹5,82,645 रुपये, नवीन किंमत ₹6,07,841 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस जीटा पेट्रोल AMT जुनी किंमत₹6,24,768 रुपये, नवीन किंमत ₹6,30,320 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस अल्फा पेट्रोल AMT जुनी किंमत₹7,09,994 रुपये, नवीन किंमत ₹7,13,898 रुपये(एक्स-शोरुम किंमत) -
Indian Air Force: “जर पाकिस्तान थांबला नाही, तर आम्ही…”, भारतानं शेजाऱ्यांना ठणकावलं; मध्यरात्रीच्या घडामोडींनंतर दिला इशारा!