• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. bajaj chetak electric sold 21 units in its first month know price specifications and all other details sas

पुण्यातून झालीये विक्रीला सुरूवात, पण बजाजची Chetak धावेचना…

मोठा गाजावाजा करत केलं होतं कमबॅक, पहिल्या महिन्यातील विक्रीची आकडेवारी वाचाच …

February 26, 2020 12:47 IST
Follow Us
  • दुचाकी बनवणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक Bajaj Auto ने गेल्या महिन्यातच आपली बहुप्रतिक्षित Chetak Electric स्कुटर लाँच केली. आता चेतकच्या विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. ही स्कुटर कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये (अर्बन आणि प्रीमियम) उतरवली आहे.
    1/15

    दुचाकी बनवणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक Bajaj Auto ने गेल्या महिन्यातच आपली बहुप्रतिक्षित Chetak Electric स्कुटर लाँच केली. आता चेतकच्या विक्रीची आकडेवारी समोर आली आहे. ही स्कुटर कंपनीने दोन व्हेरिअंटमध्ये (अर्बन आणि प्रीमियम) उतरवली आहे.

  • 2/15

    ड्रम ब्रेक असलेल्या अर्बन व्हेरिअंटची किंमत एक लाख (एक्स-शोरुम) आणि डिस्क ब्रेक असलेल्या प्रीमियम व्हेरिअंटची किंमत 1.15 लाख(एक्स-शोरुम) रुपये ठेवण्यात आली आहे.

  • 3/15

    लाँचिंगनंतर कंपनीने सर्वप्रथम पुण्यातील चार आणि बंगळुरूमधील 13 डिलरशिपमधून अवघ्या दोन हजार रुपयांमध्ये या स्कुटरसाठी बुकिंग घ्यायला सुरूवात केली.

  • 4/15

    जवळपास १४ वर्षांनंतर भारतीय रस्त्यांवर पुनरागमन केल्यामुळे या स्कुटरबाबत बरीच चर्चा होती.

  • 5/15

    आता या स्कुटरच्या विक्रीचा आकडा समोर आला आहे. कंपनीकडून पहिल्या महिन्यातील विक्रीची आकडेवारी सादर करण्यात आली. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या महिन्यात केवळ २१ चेतक स्कुटरची विक्री झाली. पण,…

  • 6/15

    पण, सध्या ही स्कुटर केवळ पुणे आणि बेंगळुरू या दोनच शहरात विक्रीसाठी उपलब्ध आहे. लवकरच कंपनी ही गाडी अन्य शहरांमध्येही विक्रीसाठी उपलब्ध करणार आहे. त्यामुळे चेतकच्या विक्रीचा वेग झपाट्याने वाढेल अशी अपेक्षा कंपनीकडून वर्तवण्यात आली आहे.

  • 7/15

    देशात दुचाकी बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये बजाज ऑटो ही दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. बजाजने चेतक ही प्रसिद्ध स्कूटर पहिल्यांदा 1972 मध्ये लॉन्च केली होती. त्यावेळी कंपनीने त्याची जाहिरात ‘नए भारत की नई उम्मीद, हमारा बजाज’ अशी केली होती, ती खूपच लोकप्रिय झाली होती. तसेच या स्कूटरला कंपनीने महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव दिले होते.

  • 8/15

    सुमारे 34 वर्षे ही स्कूटर देशातील रस्त्यांवर धावत होती. त्यानंतर 2006 मध्ये कंपनीने या स्कूटरची विक्री बंद केली होती. कारण, तोपर्यंत ऑटोमॅटिक स्कूटर्सने बाजारावर कब्जा केला होता.

  • नवीन चेतक ही बजाजची पहिलीच इलेक्ट्रिक स्कूटर असून कंपनीने Urbanite ब्रँड अंतर्गत चेतक स्कूटर इलेक्ट्रिक प्रकारात आणली आहे.
  • 9/15

    ही स्कुटर बनवण्यासाठी सॉलिड स्टील फ्रेम आणि हार्ड शीट मेटल बॉडीचा वापर करण्यात आलाय. स्कुटरमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी डेटाइम रनिंग लाइट्स आणि फुल-डिजिटल इंस्ट्रुमेंट कन्सोल आहेत. इंस्ट्रुमेंट कन्सोलमध्ये बॅटरी रेंज आणि रिअल-टाइम बॅटरी इंडिकेटरसह अन्य माहिती मिळते.

  • 10/15

    स्कुटरच्या दोन्ही बाजूंना 12-इंचाचे अॅलॉय व्हिल्स आहेत. उल्लेखनीय म्हणजे नव्या इलेक्ट्रिक चेतकमध्ये रिव्हर्स गिअरचाही पर्याय आहे. या स्कुटरवर तीन वर्षे किंवा 50 हजार किलोमीटरची वॉरंटी मिळेल, याशिवाय बजाजकडून या स्कुटरसाठी तीन फ्री सर्व्हिस मिळतील.

  • 11/15

    बजाज चेतकची इलेक्ट्रिक मोटार 5.36 bhp पीक पावर आणि 16 Nm टॉर्क निर्माण करते. स्कुटरमध्ये 3kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक आहे. या स्कुटरमध्ये फिक्स्ड टाइप बॅटरीचा वापर करण्यात आलाय, घरातल्या स्टॅंडर्ड 5-15 amp आउटलेटद्वारे चार्ज करता येणं शक्य आहे. एका तासात 25 टक्के आणि पाच तासात फुल चार्ज होते.

  • 12/15

    चेतकमध्ये दिलेल्या बॅटरीची लाइफ जवळपास 70 हजार किलोमीटर आहे असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. मोनोशॉक सस्पेंशन यामध्ये दिलं असून दोन्ही टायर्सना डिस्क ब्रेक आहेत. मल्टी स्पोक अॅलॉय व्हीलसह ट्यूबलेस टायर असलेल्या या स्कूटरच्या पुढील बाजूला कंपनीने राउंड शेप हेडलाइट दिले आहेत.

  • 13/15

    इको मोडमध्ये ही स्कूटर 95 किलोमीटरची रेंज, तर स्पोर्ट मोडमध्ये 85 किलोमीटरची रेंज देईल असा कंपनीचा दावा आहे. स्कुटरमध्ये डिजिटल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, की-लेस इग्निशन, पुढील बाजूला हेडलँप्सजवळ ओव्हल LED स्ट्रिप यांसारखे अनेक प्रीमियम फीचर्स आहेत.

  • 14/15

    (बजाज चेतक)

TOPICS
बजाजBajaj

Web Title: Bajaj chetak electric sold 21 units in its first month know price specifications and all other details sas

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.