-
गुजरात राज्यातील पोरबंदर, वेरावळ इत्यादी भागात मासेमारी बोटींवर खलाशी म्हणून काम करणाऱ्या सुमारे एक हजार नागरिकांना दक्षिण गुजरात मधील स्थानिक मच्छीमारांनी आपल्या बंदरावर उतरण्यास मज्जाव केला होता.
-
गुजरात प्रशासनाने मध्यस्थी करून या खलाशांना नागोळ व उमरगाव दरम्यानच्या खाडीमध्ये उतरवण्याची प्रक्रिया पुर्ण केली आहे.
-
खलाशांना घेऊन आलेल्या तेवीस बोटी नागोळ जवळ खाडीमध्ये नांगरण्यात आल्या असून या २३ बोटींमधील खलाशांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी गुजरात शासनाने व्यवस्था केली आहे.
-
दक्षिण गुजरात भागातील अनेक तरुण हे खलाशी म्हणून अन्य भागांमध्ये कामानिमित्त जात असतात.
-
करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने हे खलाशी पुन्हा आपल्या घराकडे निघाले आहेत. दक्षिण गुजरातमधील नागोळ व लगतच्या मासेमारी बंदरावर स्थानिकांनी या मंडळीला उतरण्यास मज्जाव केला होता.
-
प्रत्येक बोटीवर शेकडो खलाशी एकत्रित प्रवास करीत असून गुजरातमध्ये शक्य न झाल्यास महाराष्ट्रातील झाई बंदरावर उतरण्याचे त्यांचे नियोजन होते.
-
याबाबत पालघर जिल्ह्यातील मच्छीमार नेत्यांनी पालघरच्या जिल्हाधिकारी यांना सुचित केल्यानंतर त्यांनी डहाणू तालुक्यातील महसूल अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभागाचे अधिकारी तसेच तटरक्षक दलाला सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
-
याबाबत गुजरात राज्यातील शासकीय विभागाने मध्यस्थी केल्यानंतर या खलासी मंडळीना नारगोळ-उमरगाव खाडीत उतरवले.
-
त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल यांनी दिली.
-
या सर्व खलाशांचे अलगीकरण करण्याची आवश्यकता आहे, असे येथील मच्छीमारांचे म्हणणे आहे. या खलाशांमध्ये तलासरी तालुक्यातील काही तरुण असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Express photo : DEEPAK JOSHI )
महाराष्ट्रातील मच्छिमारांची गुजरातकडून कोंडी!
सर्व खलाशांचे अलगीकरण करण्याची आवश्यकता
Web Title: Nearly 600 stranded fishermens of maharashtra had to face discrimination nck