करोनापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. यात पुणेकरही मागे नाहीत. पिंपरी चिंचवडमधील एका हौशी व्यक्तीने चक्क सोन्याचा मास्क बनवला आहे. करोना संकटाच्या काळात पिंपरीतील शंकर कुराडे या हौशी व्यक्तीने जवळपास तीन लाख रुपये खर्च करुन सोन्याचा मास्क केला आहे. करोनापासून बचाव करण्यासाठी बनवलेला हा मास्क सध्या चर्चेचा विषय आहे. या मास्कमुळे संसर्गापासून संरक्षण होणार का? या सोन्याच्या मास्कमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो का? असे अनेक प्रश्नदेखील अनेकांकडून विचारले जात आहेत. याबाबत शंकर कुराडे यांनी सांगितलं की, हे एक पातळ मास्क आहे आणि याला लहान छिद्र आहे. छिद्र असल्यामुळे या मास्कमधून श्वास घेण्यास कोणताही त्रास होत नाही. परंतु कोरोना व्हायरसपासून हे मास्क बचाव करु शकतं की नाही ते सांगू शकत नसल्याचं कुराडे म्हणाले. शंकर कुराडे यांना सोन्याचे दागिने घालण्याची आवड आहे. शंकर कुराडे अनेक, मोठे दागिने घालूनच घराबाहेर फिरतात. देशातील करोनाग्रस्तांची संख्या तब्बल 6 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. तर, राज्यात तीन दिवसांपासून दररोज 6 हजारांपेक्षा जास्त नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. पुण्यात आत्तापर्यंत 6 हजार कोरोनाबाधित आढळून आले असून त्यापैकी 274 जणांचा मृत्यू झाला आहे. -
पुणे तिथे काय उणे… करोनाला लढा देण्यासाठी थेट Gold Mask…
Web Title: Gold mask pune man nck