-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी राज्यात आरोग्य यंत्रणा रात्रं-दिवस मेहनत घेत आहेत. गेल्या ४ महिन्यांत त्यांच्या या प्रयत्नांचा आता हळुहळु यश येताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यांत नव्या रुग्णांपेक्षा करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही अधिक आहे.
-
मुंबईत महापालिका आणि आरोग्य विभागातर्फे मानखुर्द भागात नागरिकांसाठी करोना चाचणी केंद्राचं आयोजन करण्यात आलं होतं. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
आपलं कर्तव्य बजावणाऱ्या या कोविड योद्ध्यांचीही स्थानिक लोकं आपुलकीने काळजी घेताना दिसत आहेत.
-
सोमवारी ७,९२४ नवे रुग्ण आढळले तर ८,७०६ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले.
-
करोनावर ठोस लस तयार करण्याचे प्रयत्न सुरु असतानाच, गेल्या काही महिन्यांत आरोग्य यंत्रणांनी उचललेल्या ठोस पावलांचंही कौतुक करावं तितकं कमी आहे.
कोविड योद्ध्यांच्या संघर्षाला यश
राज्यात २४ तासांत करोनाग्रस्त रुग्णांपेक्षा मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक
Web Title: Covid 19 testing in mankhurd on monday as more patients recover than positive patients in state on monday psd