-
देशात आतापर्यंत गर्भातील बाळाला करोनाचं संसर्ग झाल्याची घटना घडली नव्हती. पण, मे महिन्यात अशी घटना घडल्याचं समोर आलं आहे. मुलीला आईच्या गर्भात असतानाच नाळेतून करोनाचा संसर्ग झाला. ही घटना पुण्यातील ससून रुग्णालयात घडली. (फोटो : लोकसत्ता/इंडियन एक्स्प्रेस, सर्व छायाचित्र प्रातिनिधीक)
-
या दुर्मिळ घटनेचं इंडियन एक्स्प्रेसनं वृत्त दिलं आहे. या संपूर्ण घटनेची माहिती बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोगशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. आरती किणीकर यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली. “पुण्यातील ससून रुग्णालयात हडपसर परिसरात राहणारी एक २२ वर्षीय गर्भवती महिला दाखल झाली होती. प्रसुतीच्या एक दिवस अगोदर ताप आल्यानं ती मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रुग्णालयात भरती झाली होती."
-
"महिलेची आरटी-पीसीआरद्वारे करोना चाचणी करण्यात आली. चाचणी रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर अॅण्टीबॉडी टेस्ट करण्यात आली, त्यात महिलेला करोना असल्याचं निदान झालं होतं," असं डॉ. किणीकर यांनी सांगितलं.
-
“या केस संदर्भातील आमचा रिसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय जर्नलकडे पाठवला होता. तो स्वीकारण्यात आला आहे. त्याचं स्वीकृती पत्रही काल रात्री आम्हाला मिळालं आहे,” असंही किणीकर यांनी सांगितलं.
-
“बाळाची नाभी आणि नाळातील संसर्ग ओळखण्यास सक्षम होतो. आईलाही संसर्ग झालेला होता, मात्र त्याची काही लक्षणं दिसत नव्हती,” असं किणीकर म्हणाल्या.
-
(संग्रहित छायाचित्र)
-
“बाळाला अनेक लक्षण दिसून आली होती आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागले, हे सगळं खूप आव्हानात्मक होतं,” असंही त्या म्हणाल्या.
-
“प्रसुतीनंतर बाळाची व्यवस्थितपणे काळजी घेण्याची गरज होती. तशी घेतली गेली. तीन आठवड्यानंतर बाळ पूर्णपणे बरं झालं. जूनमध्ये बाळाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला,” असं बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी सांगितलं.
-
"एचआयव्ही आणि झिका व्हायरसमध्ये अशा पद्धतीनं संसर्ग झाल्याच्या नोंदी आहेत. मात्र, करोनामध्ये अशा पद्धतीचं संक्रमण होण्याबद्दलची माहिती दुर्मिळ आहे. व्हर्टिकल ट्रान्समिशन होण्याची ही घटना देशातील पहिलीच आहे," असं डॉ. तांबे म्हणाले.
-
ससूनमध्ये मागील दहा दिवसांच्या काळात ४२ करोना पॉझिटिव्ह असलेल्या महिला बाळंत झाल्या आहेत. त्यापैकी सहा बाळांना करोनाचा संसर्ग झाला होता. मात्र हा संसर्ग प्रसुतीनंतर झाला होता. (फोटो : संग्रहित/REUTERS)
करोनानं गर्भातच गाठलं, तरीही चिमुकल्यानं दिली ‘फाईट’!
देशातील पहिलीच घटना
Web Title: Vertical transmission of covid from mother to child researchers document first reported case in india bmh