-
करोनाने देशभरात थैमान घातलेलं असतानाच अनेक राजकीय नेत्यांनाही करोनाची लागण झाली आहे. काही लोकप्रतिनिधींना करोनामुळे आपला जीवही गमवावा लागला आहे. करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अद्यापही प्रयत्न सुरु आहेत. मागील २४ तासांत भाजपाच्या पाच नेत्यांना करोनाची लागण झाली आहे..
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने चाचणी केली असता आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं अमित शाह यांनी सांगितलं. अमित शाह यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेणार असल्याची माहिती दिली आहे. अमित शाह एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. (संग्रहित छायाचित्र) अमित शाह यांनी ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, “करोनाची प्राथमिक लक्षणं दिसत असल्याने आपण चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती ठीक आहे, पण डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आपण रुग्णालयात दाखल होत आहोत. माझी विनंती आहे की, गेल्या काही दिवसांमध्ये जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वत:चं विलगीकरण करावं आणि आपली चाचणी करुन घ्यावी”. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. येडियुरप्पा यांनीच ट्विटवरुन यासंदर्भात खुलासा केला आहे. माझी प्रकृती ठीक असून खबरदारीचा उपाय म्हणून मी रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे अशी माहिती येडियुरप्पा यांनी ट्विटवरुन दिली आहे. (फाइल फोटो) “माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती ठीक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे मी खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला क्वारंटाइन करावे अशी मी विनंती करतो,” असं ट्विट येडियुरप्पा यांनी केलं आहे. उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेश अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनाही रविवारी करोनाची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांनी ट्विट करच माहिती दिली आहे. स्वतंत्र देव सिंह यांनी ट्विट करत म्हटले की, 'लक्षणे दिसल्यानंतर करोनाची चाचणी केली असता माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना निवेदन आहे की नियमांनुसार त्यांनी क्वारंटाइन व्हावं तसेच गरज पडल्यास करोना चाचणी करावी.' उत्तर प्रदेश योगी सरकारमधील मंत्री डॉक्टर महेंद्र सिंह यांचा रविवारी करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. -
प्रतिकात्मक छायाचित्र
-
देशात करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे.
एकाच दिवसात पाच भाजपा नेते करोना पॉझिटिव्ह
Web Title: Corona virus bjp leadar amit shah yediyurappa nck