-
पुणे शहराला अद्यापही करोना विषाणूचा विळखा कायम आहे. प्रशासनाने काही दिवसांपूर्वी लॉकडाउन होणार नसल्याचं जाहीर केलं असलं तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाचे अधिकारी घराघरांत जाऊन करोनाची चाचणी करत आहेत. (सर्व छायाचित्र – अरुल होरायझन)
-
पुण्यातील जनता वसाहत भागात करोनाग्रस्त रुग्णांचे नातेवाईक आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी करण्यात आली.
-
अनेकदा नकळत संपर्कात आल्यामुळे करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत.
-
चाचणी करण्याआधी सर्व साहित्य सॅनिटाईज करुन घेताना आरोग्य विभागाचे कर्मचारी.
-
चाचणी करायला गेल्यानंतर, या चाचणी गरज का आहे याची माहिती नागरिकांना समजावून सांगण्यात येत आहे.
-
पुण्यात रविवारी दिवसभरात १ हजार ३९० नवे करोनाबाधित आढळले, तर २४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
-
शहरात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ६५ हजाराच्या वर पोहचली आहे.
-
या विषाणूशी लढताना आतापर्यंत दीड हजारापेक्षा जास्त पुणेकर नागरिकांनीआपले प्राण गमावले आहेत.
-
गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलेलं असलं तरीही खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभाग अजुनही घराघरांत जाऊन चाचण्या करत आहे.
-
दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने होतो.
-
पुणे शहरात सध्या लॉकडाउन नसलं तरीही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सर्वांच्या मनात भीतीचं वातावरण कायम आहे.
पुणे शहर अजुनही करोनाच्या विळख्यात
Web Title: Health workers screening the family members and neighbors of covid positive patients in pune psd