-
पुणे शहर आणि ग्रामीण भागात सातत्याने करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ होताना पहायला मिळते आहे. त्यामुळे प्रशासनाकडून पुण्यात पुन्हा एकदा लॉकडाउन जाहीर केलं जाण्याची शक्यता आहे. पुणे ग्रामीण येथील वाघोली ग्रामपंचायतीने ६ दिवसांना जनता कर्फ्यू घोषित केला आहे. (सर्व छायाचित्र – आशिष काळे)
-
१२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर या काळात हा कर्फ्यू राबवला जाणार आहे. करोनाबाधित रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
ग्रामपंचायतीने याची माहिती देणारा फलक गावाच्या बाहेर प्रवेशद्वाराबाहेर लावला आहे.
-
वाघोतील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं या काळात बंद राहणार आहेत.
-
खबरदारीचा उपाय म्हणून गावाच्या वेशीवर बॅरिकेटींग करण्यात आलंय.
करोनाशी लढा : वाघोलीत ६ दिवसांचा जनता कर्फ्यू
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
Web Title: Grampanchayat of wagholi has declared a 6 days janta curfew in the area to stop spread of covid 19 psd