-
गेला आठवडाभर चारशेच्या आत करोनाबाधित रुग्णांची संख्या आढळून येणाऱ्या नवी मुंबईत येत्या काळात कल्याण-डोंबिवलीप्रमाणे दुसरी करोना लाट येण्याची शक्यता पालिकेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. (सर्व छायाचित्र – अमित चक्रवर्ती)
-
वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासनात चिंतेचे वातावरण असून पालिकेने काळजी केंद्र, प्राणवायू पुरवठा कक्ष आणि अतिदक्षता कक्षाची युद्धपातळीवर व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे.
-
नेरुळ पुर्व येथील महापालिकेच्या मीनाताई ठाकरे रुग्णालयात दररोज करोना चाचण्या सुरु आहेत.
-
नवी मुंबई पालिका क्षेत्रातील करोना रुग्णांची संख्या तीस हजारांच्या वर गेली आहे.
-
नवी मुंबई पालिका क्षेत्रात मागील एक आठवडाभर कमीत कमी २६५ ते जास्तीत जास्त ३९० रुग्णसंख्या दिवसाला आढळून आली आहे.
-
पालिकेने आरटीपीसीआर व प्रतिजन चाचण्या मोठय़ा प्रमाणात वाढविल्याने ही रुग्णसंख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे.
-
करोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवताना मृत्युदर कमी राखण्याचा प्रयत्न पालिका करीत आहे, मात्र त्याला म्हणावे तसे यश येताना दिसत नाही.
-
महिनाअखेरीस शहरात पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढण्याची भीती पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नवी मुंबईत करोनाची दुसरी लाट??
वाढत्या रुग्णसंख्येमुळे पालिका प्रशासन चिंतेत
Web Title: Covid testing in progress at the navi mumbai mahanagar palikas meenatai thackrey hospital as officials fear may be second wave of covid 19 in city psd