-
(संग्रहित छायाचित्र)
-
मुंबईत करोनाच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या आरोग्य सेवेतील चार कर्मचाऱ्यांना पुन्हा करोनाची लागण झाली आहे. प्रसिद्ध लॅन्सेट जर्नलमध्ये याविषयीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. अहवालानुसार चारही जणांमध्ये करोना संक्रमणाची तीव्रती पूर्वीपेक्षा अधिक आहे.
-
दुसऱ्यांदा करोना झालेल्या रुग्णांपैकी तीन जण डॉक्टर आहेत. हे तिन्ही डॉक्टर बृह्नमुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात कार्यरत आहेत. तर एक आरोग्य कर्मचारी हिंदुजा रुग्णालयातील आहे. हा अभ्यास इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स अॅण्ड इंट्रिग्रेटिव बॉयलॉजी (IGIB) आणि दिल्लीतील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अॅण्ड बॉयोटेक्नॉलॉजी (ICGEB) दोन्ही संस्थांनी केली आहे.
-
नायर रुग्णालयाच्या डॉ. जयंती शास्त्री व 'आयसीजीबी'च्या डॉ. सुजाता सुनील यांनी या अभ्यासावर भाष्य केलं आहे. आरोग्य सेवेत कार्यरत असलेले चौघांनाही दुसऱ्यांदा करोनाची लागण झाली आहे. पूर्वीच्या करोना संसर्गाच्या तुलनेत दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर चौघांनाही अधिक गंभीर लक्षण दिसून आली आणि त्यांची प्रकृतीही नाजूक बनली होती.
-
संग्रहित छायाचित्र
-
डॉ. सुनील म्हणाले, एका आरटी-पीसीआर चाचणीतून दुसऱ्यांदा करोना झाल्याचं निश्चितपणे निदान होऊ शकत नाही. संपूर्ण जिनोम सिक्वेसिंगमधूनच पुन्हा संसर्ग झाला आहे की नाही यांचं निदान केलं जाऊ शकतं. करोनाचा पहिल्यांदा संसर्ग झाल्यानंतर रुग्णाला लक्षण दिसत नाही, वा कमी प्रमाणात दिसतात. मात्र, जेव्हा दुसऱ्यांदा करोना होतो, तेव्हा रुग्णांची परिस्थिती गंभीर बनते.
-
दुसऱ्यांदा करोना झालेल्या या चारही रुग्णांना रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं, असंही या अभ्यासात म्हटलं आहे.
-
महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा करोनाचा संसर्ग झाल्यानंतर या चौघांनाही श्वास घेण्याचा त्रास जाणवला नाही. या चौघांचंही वय कमी असल्यानं हे झालं असावं. हा अभ्यास प्रसिद्ध करण्यामागे ही माहिती लोकांपर्यंत पोहोचावी हा, आहे.
-
सुरूवातीच्या टप्प्यात करोनाचा प्रसार जगभरात झाल्यानंतर दुसऱ्यांदा संसर्ग झाल्याच्या केस कुठेही दिसून आल्या नव्हत्या. मात्र, आता हळूहळू जगभरात दुसऱ्यांदा करोना होत असल्याची प्रकरणं आढळून येऊ लागली आहे.
-
सप्टेंबरच्या सुरूवातीलाच हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा दुसऱ्यांदा करोना झाल्याची केस आढळून आली होती. त्यानंतर हळूहळू इतर देशातही दुसऱ्यांदा करोना झाल्याची प्रकरणं समोर आली. बंगळुरूमध्येही फोर्टिस रुग्णालयानं एका रुग्णाला दुसऱ्यांदा करोना झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी दिली होती. (सर्व छायाचित्र संग्रहित असून, प्रातिनिधीक आहेत.)
मुंबई-महाराष्ट्राच्या काळजीत भर… चार जणांना दुसऱ्यांदा करोना, लक्षणं गंभीर
दुसऱ्यांदा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांची स्थिती होते गंभीर
Web Title: Covid reinfection coronavirus healthcare worker mumbai lancet medical journal bmc nair hospital hinduja hospital mahim bmh