-
पुणे शहराला अजुनही करोनाचा विळखा कायम आहे, दिवसेंदिवस शहरातील रुग्णसंख्येत वाढ होत असून अनेकांना यामुळे आपले प्राण गमवावे लागत आहेत. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
पुणे महापालिकेतर्फे शहरातील नागरी वस्त्यांमध्ये करोना चाचणी केंद्राचं आयोजन करण्यात येत आहे.
-
पुण्यातील धनकवडी भागात रविवारीही करोना चाचणी केंद्रावर तपासणीसाठी नागरिकांची गर्दी दिसत होती.
-
पुणे शहरात रविवारी नव्याने १५४८ रुग्ण आढळून आले.
-
शहरातील एकूण रुग्णसंख्या १ लाख ४२ हजार १३६ एवढी झाली आहे.
-
रविवारी ४१ रुग्णांनी करोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. आतापर्यंत शहरात ३ हजार ३७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
-
आतापर्यंत करोनावर उपचार घेणार्या १५९९ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे.
-
रविवारी दिवसाअखेरीस १ लाख २१ हजार १७६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.
-
पुण्यासोबतच शेजारील पिंपरी-चिंचवड परिसरातही करोनाचा कहर वाढत आहे.
पुण्याला करोनाचा विळखा कायम, रुग्णसंख्येत सातत्याने वाढ
Web Title: Covid swab collection centres in dhankawadi in pune psd