• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. get to know the personality of us vice president kamala harris who made history aau

इतिहास घडवणाऱ्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं व्यक्तिमत्व जाणून घ्या

Updated: September 9, 2021 18:37 IST
Follow Us
  • अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची नुकतीच निवडणूक पार पडली, यामध्ये डेमोक्रेटिक पार्टीचा विजय झाला असून या पक्षाचे जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष तर कमला देवी हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. (सर्व छायाचित्र - कमला हॅरिस इन्स्टाग्राम)
    1/10

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाची नुकतीच निवडणूक पार पडली, यामध्ये डेमोक्रेटिक पार्टीचा विजय झाला असून या पक्षाचे जो बायडन हे राष्ट्राध्यक्ष तर कमला देवी हॅरिस या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला. (सर्व छायाचित्र – कमला हॅरिस इन्स्टाग्राम)

  • 2/10

    भारतीय तामिळ आणि अॅफ्रो-कॅररिबियन वंशाच्या असलेल्या कमल हॅरिस बहुजातीय अमेरिकन आहेत. अमेरिकेच्या इतिहासात कमला हॅरिस या पहिल्या इंडियन-अमेरिकन आणि पहिल्या अफ्रिकन-अमेरिकन महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत.

  • 3/10

    अमेरिकेतील कॅलिफोर्निया प्रांतातील ऑकलंड येथे त्यांचा २० ऑक्टोबर १९६४ रोजी जन्म झाला. हॉवर्ड आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. अमेरिकेत सिव्हिल राईट्स अॅक्ट १९६४ लागू होण्यापूर्वी हिस्टॉरिकल ब्लॅक कॉलेजेस अॅण्ड युनिव्हर्सिटीज (एचबीसीयू) येथूनही कमला हॅऱिस यांनी शिक्षण घेतलं आहे. एचीबीसीयूतील मित्र-मैत्रिणींसोबत एका मजेशीर क्षणी टिपलेलं त्याचं छायाचित्र.

  • 4/10

    सन २०१६ मध्ये अमेरिकेच्या सिनेटच्या निवडणूकीत त्या निवडून आलेल्या पहिल्या अफ्रिकन अमेरिकन आणि पहिल्या साऊथ एशियन अमेरिकन महिला सिनेट सदस्य ठरल्या होत्या.

  • 5/10

    सन २००८ मध्ये कमला हॅरिस यांची कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरलपदी नियुक्ती झाली. दरम्यान, त्यांनी विविध सामाजिक प्रश्न सोडवण्यामध्ये पुढाकार घेतला. यामध्ये ग्राहक संरक्षण, गोपनियतेचा हक्क, गुन्हेगारी न्याय सुधारणा, एलजीबीटींचे हक्क, सार्वजनिक सुरक्षा याबाबत काम केलं.

  • 6/10

    कमला हॅरिस यांचं डॉग्लस एम्हॉफ यांच्याशी लग्न झालं असून त्या ख्रिश्चन धर्मिय आहेत.

  • 7/10

    अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर टाइम मासिकानं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅऱिस यांचा फोटो मुखपृष्ठावर प्रसिद्ध केला.

  • 8/10

    भारतातील आपल्या कुटुंबियांसोबतचं त्याचं एक जुनं छायाचित्र. यामध्ये त्यांनी पारंपारिक भारतीय साडी परिधान केली आहे.

  • 9/10

    अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर हात उचांवून विजयी मुद्रा दाखवताना जो बायडन आणि कमला हॅरिस.

  • 10/10

    कमला हॅरिस यांच्या विजयानंतर बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी आपली भाची प्रीता हिचा हॅरिस यांच्या सोबतचा फोटो ट्विट करीत हॅऱिस यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

Web Title: Get to know the personality of us vice president kamala harris who made history aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.