• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. soldiers celebrate diwali in ladakh in minus 20 degree temperature aau

उणे २० डिग्री : लडाखमध्ये जवानांचं उत्साहात दिवाळी सेलिब्रेशन

Updated: September 9, 2021 18:36 IST
Follow Us
  • इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसांनी (आयटीबीपी) लडाखमध्ये उणे २० डिग्री तापमानात दिवाळी साजरी केली. (All Photo source :@ITBP_official)
    1/10

    इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीसांनी (आयटीबीपी) लडाखमध्ये उणे २० डिग्री तापमानात दिवाळी साजरी केली. (All Photo source :@ITBP_official)

  • 2/10

    १७,००० फूट उंचावरील या ठिकाणी सध्याचं तापमान हे शून्याखाली आहे. मात्र, तरीही आपला उत्साह कायम असणाऱ्या आयटीबीपीच्या जवानांनी वाजत गाजत दिवाळी साजरी केली.

  • 3/10

    जवानांनी पारंपारिक स्वरुपातील पणत्या प्रज्वलित करुन आपल्या सहकाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

  • 4/10

    दिव्यांच्या आराससहित नाच-गाणी करीत जवानांनी दिवाळीच्या या पर्वाचा आनंद लुटला.

  • 5/10

    लडाखमधून २,४८८ किमी लांब भारत-चीन सीमा जाते. सध्या इथलं तापमान हे उणे २० डिग्री सेल्सिअस आहे ते थंडीच्या दिवसात उणे ४० डिग्रीपर्यंत खाली जाते, अशा प्रतिकूल परिस्थितीत सणउत्सव त्यांच्यामध्ये नवी प्रेरणा निर्माण करतात.

  • 6/10

    यंदाच्या दिवाळीच्या सेलिब्रेशनदरम्यान जवानांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं प्रसिद्ध गीत 'आओ फिर फिर दिया जलाएं' गायलं. तसेच ते दिवाळीनिमित्त देशवासियांना अर्पण केलं.

  • 7/10

    सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या आठवणींसाठी आपल्या दारात एक दिवा लावा, असं आवाहन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला केलं होतं.

  • 8/10

    दरम्यान, शनिवारी स्वतः जैसलमेर येथील सीमेवर जाऊन मोदींनी यंदाची दिवाळी बीएसएफच्या जवानांसोबत साजरी केली.

  • 9/10

    अतिशय बिकट परिस्थितीत देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या आयटीबीपीच्या जवानांचा दिवाळी सेलिब्रेशनदरम्यानचा उत्साह वाखाणण्याजोगा आहे.

  • 10/10

    उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांनी हर्शिल व्हॅलीतील कोपंग येथे जाऊन आयटीबीपीच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी जवानांना मिठाईचे वाटप केले.

TOPICS
दिवाळी २०२४Diwali 2024

Web Title: Soldiers celebrate diwali in ladakh in minus 20 degree temperature aau

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.