Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. coronavirus vaccination update covid vaccination pune hospitals preparation photo bmh 90 svk

पुणे लसीकरणासाठी सज्ज… हे पहा रुग्णालयातील फोटो

८ ठिकाणी केले जाणार लसीकरण

Updated: September 9, 2021 00:37 IST
Follow Us
  • नागरिकांच्या नजरा लागलेल्या बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला काही वेळात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असून, देशभरात याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यातही सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. (छायाचित्रं/सागर कासार_लोकसत्ता)
    1/10

    नागरिकांच्या नजरा लागलेल्या बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला काही वेळात सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असून, देशभरात याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. पुण्यातही सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. (छायाचित्रं/सागर कासार_लोकसत्ता)

  • 2/10

    पुण्यातील मोजक्याच रुग्णालयात लसीकरण केलं जाणार आहे. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठीची आवश्यक तयारी करण्यात आली आहे.

  • 3/10

    पुणे महापालिकेकडून लसीकरण मोहिमेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

  • 4/10

    शव्यापी लसीकरण मोहिमेचा पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात शुभारंभ आज सकाळी ९ वाजता झाला आहे. त्या पूर्वीच रुग्णालय इमारतीमध्ये ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाकडून सर्व तयारी करण्यात आली आहे.

  • 5/10

    पुणे शहरातील ८ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. (छायाचित्रं/सागर कासार_लोकसत्ता)

  • 6/10

    पुण्यात लसीकरण मोहीम राबवल्या जाणाऱ्या रुग्णालयांमध्ये राजीव गांधी रुग्णालय (येरवडा), कमला नेहरू रुग्णालय (मंगळवार पेठ), ससून रुग्णालय (पुणे स्टेशन), सुतार दवाखाना (कोथरूड), दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (एरंडवणा), रूबी हॉल क्लीनिक (ताडीवाला रस्ता), नोबल हॉस्पिटल (हडपसर), भारती हॉस्पिटल (धनकवडी) यांचा समावेश आहे.

  • 7/10

    करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत.

  • 8/10

    आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे.

  • 9/10

    लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

  • 10/10

    करोना लसीकरण मोहिमेमुळे पोलिओ लसीकरणाच्या वेळापत्रकामध्येही बदल करण्यात आला आहे. आता पोलिओ लसीकरण ३१ जानेवारीला करण्यात येणार आहे. (छायाचित्रं/सागर कासार_लोकसत्ता)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Coronavirus vaccination update covid vaccination pune hospitals preparation photo bmh 90 svk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.