-
पैठणच्या नाथसागरात हजारोंच्या संख्येने रोहित (फ्लेमिंगो) दाखल झाले आहेत. पैठणचे सहायक वनसंरक्षक अधिकारी राजेंद्र नाळे यांनी ही माहिती दिली.
-
फ्लेमिंगो साधारण हिवाळ्यात येतात. मात्र यंदा पाणी जास्त असल्याने उशिराने आले.
-
काठाच्या भागात जलाशय अधिक भरलेला असेल तर फ्लेमिंगोंना भक्ष्य टिपता येत नाही.
-
वनविभागाने १ मार्च रोजी केलेल्या पक्षीगणनेत फ्लेमिंगो आढळून आले नव्हते.
-
साधारण २० मार्चपासून हळूहळू फ्लेमिंगोंची संख्या वाढत असल्याची माहिती पैठणचे सहायक वनसंरक्षक अधिकारी राजेंद्र नाळे यांनी दिली.
-
फ्लेमिंगोंना मराठीत रोहित म्हटले जाते.
-
सायबेरियातूनही अनेक फ्लेमिंगो काही काळासाठी स्थलांतरित होतात.
-
या पुढील काळात फ्लेमिंगोच्या संख्येत आणखी वाढ होईल, असं सांगितलं जात आहे.
-
फ्लेमिंगोसोबतच नाथसागरात सूरय प्रजातीचे पक्षी देखील आढळून आले.
पैठणच्या नाथसागरात मोठ्यासंख्येने फ्लेमिंगोंचे आगमन
फ्लेमिंगोसोबतच सूरय प्रजातीचे पक्षी देखील आढळून येत आहेत.
Web Title: Arrival of a large number of flamingos in the nathsagar of paithan msr