Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. todays photo 3
  4. weekend lockdown in maharashtra night curfew weekend lockdown to curb covid bmh

घरीच थांबा! वीकेंड लॉकडाउनचे हे फोटो पाहिलेत का?

करोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईतही करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली

Updated: September 9, 2021 00:29 IST
Follow Us
  • महाराष्ट्र पुन्हा एकदा करोनाच्या संकटाला तोंड देतोय. करोना विषाणूनं दुसऱ्या लाटेच्या रुपाने राज्यात थैमान घातलं असून, परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आठवड्याच्या शेवटी बाहेर पडणारी गर्दी रोखण्यासाठी सरकारने वीकेंड लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट असून, मुंबईतील रस्त्यांवरही सगळीकडे सामसून बघायला मिळाली. (Express photo by Ganesh Shirsekar)
    1/20

    महाराष्ट्र पुन्हा एकदा करोनाच्या संकटाला तोंड देतोय. करोना विषाणूनं दुसऱ्या लाटेच्या रुपाने राज्यात थैमान घातलं असून, परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आठवड्याच्या शेवटी बाहेर पडणारी गर्दी रोखण्यासाठी सरकारने वीकेंड लॉकडाउन लागू केला आहे. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट असून, मुंबईतील रस्त्यांवरही सगळीकडे सामसून बघायला मिळाली. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 2/20

    राज्यात करोनाची दुसरी लाट आल्यानंतर मुंबईतही करोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 3/20

    मुंबईत गेल्या काही दिवसांपासून तब्बल दिवसाला दहा हजारांच्या सरासरीने बाधित रुग्ण आढळून येत आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 4/20

    दुसरीकडे राज्यात ५० ते ६० हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत आहे. प्रचंड वेगानं होत असलेलं संक्रमण आणि वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला होता. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 5/20

    सरकारच्या नव्या नियमानुसार राज्यात दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 6/20

    सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. तर शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्ण लॉकडाउन असणार आहे. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 7/20

    राज्यातील पहिल्या वीकेंड लॉकडाउनला शुक्रवारपासून (९ एप्रिल) सुरूवात झाली. त्यानंतर पुन्हा एकदा गर्दीने वाहणारे मुंबईतील रस्ते सामसूम झालेले दिसले. (Express photo by Ganesh Shirsekar)

  • 8/20

    मुंबईत महापालिकेनं गर्दी रोखण्यासाठी उपाययोजना हाती घेतल्याअसून, पोलिसांकडून लॉकडाउनची अंमलबजावणी केली जात आहे. (Photo : ANI)

  • 9/20

    शुक्रवारी रात्री लॉकडाउनची सुरूवात झाल्यापासूनच प्रभाव दिसून आला. तर शनिवारी सकाळी वाहनांची वर्दळ असणाऱ्या रस्ते सुनेसुने दिसत आहेत. (Photo : ANI)

  • 10/20

    वीकेंडच्या दिवशी गर्दीने फुलून जाणारी मुंबईतील ठिकाणांवर निरव शांतता होती. (Photo : ANI)

  • 11/20

    विनाकारण फिरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. याचा परिणामही दिसून आला आहे. (Photo : ANI)

  • 12/20

    रस्त्यावर दिसणाऱ्या वाहनांची तपासणी पोलिसांनाकडून केली जात आहे. (Photo : ANI)

  • 13/20

    महत्त्वाचं म्हणजे मरिन ड्राइव्ह, जुहू चौपाटी अशी ठिकाणी वीकेंडला गर्दीने फुलून जातात. अशा ठिकाणीही पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. (Photo : ANI)

  • 14/20

    संपूर्ण लॉकडाउनच्या काळात अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असल्यानं सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांवर कोणतीही बंधनं घातलेली नाहीत. (Photo : ANI)

  • 15/20

    छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि महापालिकेचं कार्यालय असलेल्या परिसरात नेहमीच तुडूंब गर्दी असते. पण, लॉकडाउनमुळे शुकशुकाट दिसत आहे. (Photo : ANI)

  • 16/20

    मुंबईला इतर शहरांशी जोडणाऱ्या महामार्गावरही किंचितच वाहनं बघायला मिळत आहे. (Photo : ANI)

  • 17/20

    शहराबरोबरच मुंबईतील महामार्गांवरही पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. (Photo : ANI)

  • 18/20

    एरवी वाहतूक कोंडीने चर्चेत असणारे रस्तेही वाहनांविना दिसत आहेत. (Photo : ANI)

  • 19/20

    अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच जाऊ दिलं जात असून, विनाकारण फिरणाऱ्यांना पुन्हा घरी पाठवलं जात आहे. (Photo : ANI)

  • 20/20

    सीएसएमटी स्थानकाबाहेरील हे दृश्य. (Photo : ANI)

TOPICS
करोना विषाणूCoronavirus

Web Title: Weekend lockdown in maharashtra night curfew weekend lockdown to curb covid bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.