-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यामध्ये एक विशेष कलाकृती साकारण्यात आलीय. या चित्राचा आकार पाहिल्यास खरोखरच पुणेकर मनसे कार्यकर्त्यांनी राज यांना दिलेलं हे मोठं सप्राइज ठरलं आहे, असं म्हणता येईल.
-
पुणे शहर मनसे अध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांच्या पुढाकारातून ही कलाकृती साकारण्यात आलीय.
-
राज यांच्या वाढदिवसानिमित्त रात्री बाराच्या सुमारास या कलाकृतीचे अनावरण करण्यात आलं.
-
राज यांचे ५३ बाय ५३ फूट आकाराचे भिंती चित्र रेखाटण्यात आलं आहे.
-
कात्रज येथे ही कलाकृती साकारण्यात आलीय.
-
मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या हस्ते रात्री या चित्राचे अनावरण करण्यात आलं.
-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी या चित्राचं अनावरण केलं.
-
या चित्राचं अनावरण करण्यासाठी राजू पाटील पुण्याला आले होते.
-
मागील बऱ्याच दिवसांपासून या कलाकृतीचं काम सुरु होतं.
-
कात्रजमध्ये हे चित्र चर्चेचा विषय ठरत आहे.
-
(सर्व फोटो मनसे पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे यांच्याकडून साभार)
Photos : एवढं मोठं सप्राइज… ५३ व्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंना पुणेकरांकडून खास भेट
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५३ वा वाढदिवस आहे. राज यांच्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांनी त्यांना एक खास भेट दिलीय
Web Title: Mns chief raj thackeray birthday special 53 by 53 feet wall art in pune katraj svk 88 scsg